एक्स्प्लोर

संसदेत अभद्र भाषा वापरणाऱ्या भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई होणार? दोन्ही बाजूंनी पत्रव्यवहार सुरू

 संसदेत अभद्र भाषा वापरणाऱ्या भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई होणार की नाही..या प्रश्नाची चर्चा सुरु असताना दोन्ही बाजूंनी पत्रकबाजी सुरु झाली आहे.

नवी दिल्ली नव्या संसदेत (New Parliament) मुहूर्त शोधून कामकाजाचा शुभारंभ तर झाला. पण याच नव्या संसदेत भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri)  यांच्या अभद्र भाषेनं चांगलाच गदारोळ निर्माण झालाय. एकीकडे या विधानावरुन भाजपनं (BJP) बिधुरी यांना नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे भाजपचेच खासदार बिधुरी यांच्या बचावासाठी धावताना दिसतायत, लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिताना दिसत आहेत.  

 संसदेत अभद्र भाषा वापरणाऱ्या भाजप खासदार रमेश बिधुरी यांच्यावर कारवाई होणार की नाही..या प्रश्नाची चर्चा सुरु असताना दोन्ही बाजूंनी पत्रकबाजी सुरु झाली आहे. लोकसभा अध्यक्षांसमोर दोन्ही बाजूंचे खासदार वेगवेगळी बाजू मांडत आहेत. भाजपचे निशिकांत दुबे, रविकिशन हे दोन खासदार बिधुरी यांच्या बचावाला धावले. दानिश अली यांनी सुरुवात केली, त्यांनी उकसावणारे शब्द वापरले त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती त्यांनी लोकसभा अध्यक्षांना केली आहे.

रमेश बिधुरी यांनी दिलगिरी व्यक्त केली नाही

 रमेश बिधुरी यांनी ज्यांच्याविरोधात अपशब्द वापरले ते दानिश अली  हे बसपाचे खासदार आहेत पण या प्रकरणात बसपापेक्षा इतरच पक्ष जास्त आक्रमक आहेत. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, तृणमूलच्या अपूर्वा पोद्दार, डीएमकेच्या कनिमोळी, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी लोकसभा अध्यक्षांना या प्रकरणात हक्कभंग प्रस्तावाची नोटीस दिली आहे. दानिश अली यांच्या नेत्या आहेत मायावती. मायावतींनीही अजून दानिश अली यांची भेट घेतलेली नाही. त्याआधी राहुल गांधी दानिश अली यांच्या भेटीला पोहचले.  दुसरीकडे इतके अपशब्द वापरुनही रमेश बिधुरी हे बिनधास्त आहेत. या सगळ्या वादानंतर आपल्या वक्तव्याबद्दल त्यांना जराही दिलगिरी व्यक्त करावीशी वाटली नाही. अध्यक्ष आपलं काम करतील असंच ते म्हणालेत. 

बिधुरी यांच्या वक्तव्यावर सर्वस्तरातून टीका होऊ लागल्यानंतर भाजपनंही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 15 दिवसांत उत्तरासाठी वेळ दिला आहे. पण दुसरीकडे भाजपचेच खासदार एकापाठोपाठ एक बचावासाठी धावतायत. लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहितायत. त्यामुळे आता नव्या संसदेत इतक्या अपशब्दांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला लाज आणणाऱ्या बिधुरी यांच्यावर काही कारवाई होते की दानिश अली यांनाच जबाबदार ठरवलं जातं हे पाहावं लागेल.

शिव्यांची लाखोली वाहिलेला व्हिडीओ व्हायरल

लोकसभेच्या कामकाजादरम्यान दिल्ली भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपचे दानिश अली यांना 'दहशतवादी' म्हणून संबोधले. रमेश बिधुरी यांनी अनेक शिव्यांची लाखोली भर संसदेत वाहिली. संसदेत महिला खासदार बाजूला आहेत याचंही त्यांना भान राहिलं नाही. लोकनियुक्त खासदाराला भर संसदेत शिव्यांची लाखोली वाहिलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा :

Supriya Sule On Ramesh Bidhuri:रमेश बिधुरींच्या विरोधात हक्कभंग प्रस्तावासाठी सुप्रिया सुळेंची नोटीस

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Embed widget