एक्स्प्लोर

उत्कल एक्स्प्रेस दुर्घटना : रेल्वेच्या 8 बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई

मुजफ्फरनगरमधील उत्कल एक्स्प्रेस दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. रेल्वेच्या आठ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे.

नवी दिल्ली : मुजफ्फरनगरमधील उत्कल एक्स्प्रेस दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. रेल्वेच्या आठ अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. ज्युनियर इंजिनियर, सिनियर सेक्शन इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, सिनियर डिव्हिजन इंजिनियर यांचं निलंबन, उत्तर रेल्वेचे मुख्य चीफ ट्रॅक इंजिनियरची बदली, तर डीआरएफ दिल्ली, उत्तर रेल्वेचे जनरल मॅनेजर आणि रेल्वे बोर्डाचे मेंबर इंजिनियर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मुजफ्फरनगरमधील खतौलीमध्ये उत्कल एक्प्रेसच्या अपघातात 14 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाला असून, 90 हून अधिक जण जखमी झाले आहे. यातील 22 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर मुजफ्फरनगर, मेरठ आणि हरिद्वारमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे सहा पुरावे : एबीपी न्यूजने घटनास्थळी जाऊन घटनेची पडताळणी केली. यामध्ये काही धक्कादायक बाबी आढळून आल्या. या पडताळणीत अशा काही गोष्टी आढळून आल्या, ज्यामुळे या दुर्घटनेला रेल्वेचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचं सिद्ध होतं. पुरावा 1 : एबीपी न्यूजचे प्रतिनिधी घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना हातोडा आढळून आला, जो रेल्वे कर्मचाऱ्यांचाच असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय तांत्रिक काम करतानाचं रेल्वेचं साहित्यही ट्रॅकशेजारीच पडून होतं. पुरावा 2 : अपघात झाला त्या ठिकाणी ट्रेनचं इमर्जन्सी ब्रेक लावल्याचंही आढळून आलं. पुरावा 3 : ज्या रेल्वे रुळावर ही घटना घडली तिथे ट्रॅकचा तुकडा कापलेल्या अवस्थेत आढळून आला. सोबतच दोन रुळांना जोडणारी फिश प्लेटही मिळाली. ज्यामुळे रेल्वे रुळावर दुरुस्तीचं काम सुरु असल्याचं सिद्ध होतं. पुरावा 4 : घटनास्थळापासून काही अंतरावर लाल झेंडा आढळून आला. दुरुस्तीचं काम सुरु असल्यानंतर हा लाल झेंडा वापरला जातो. पुरावा 5 : रेल्वे रुळाचं काम चालू असताना ट्रेन तिथून गेली, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. विशेष म्हणजे अपघातावेळी घटनास्थळी काही रेल्वेचे कर्मचारी असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. पुरावा 6 : रेल्वे रुळावर दुरुस्तीचं काम चालू होतं आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवला, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्य गृह सचिव अरविंद कुमार यांनी दिली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Electricity Rates Decrease In Mumbai मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
मोठी बातमी: बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात, 1 एप्रिलपासून नवे दर लागू, पाहा जुने आणि नवीन दर!
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Maharashtra Live blog updates: मुंबईतील गृहिणीला तोतया पोलिसांनी लुटले, 2 लाख घेऊन पसार
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
Ashok Kharat: भक्तांच्या घरी जाण्यासाठी भोंदूबाबा अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर...
भक्तांच्या घरी जाण्यासाठी अशोक खरात किती पैसे घ्यायचा, चक्रावून जाणारी माहिती समोर, पुण्याच्या भक्ताने तर.
South Cinema Actress Net Worth: ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
ना अनुष्का शेट्टी, ना समंथा अन् ना तमन्ना भाटीया; 'ही' साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री, एकूण संपत्ती 200 कोटी
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
Embed widget