एक्स्प्लोर
LIVE : नाशिकमध्ये पुन्हा जळीतकांड, 6 बाईक जाळल्या

हेडलाईन्स मुंबई-गोवा हायवेवर वाहतुकीची कोंडी, वाहन चालकांच्या बेशिस्तीमुळे खोळंबा ------------------- नाशिक : सिडकोत पुन्हा जळीतकांड, महालक्ष्मीनगरमधील निल निलांजन सोसायटीत 6 दुचाकी जाळल्या, 2 दिवसांपूर्वी याच परिसरात 6 दुचाकी जाळल्या होत्या ----------------- लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सिंहगड काॅलेजजवळ कारचा अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला धडकली, दोघांचा मृत्यू, तीन जखमी ----------------- 1. 2008 च्या मालेगाव स्फोटातून साध्वी सुटणार, सबळ पुरावे नसल्याची एनआयएची कोर्टात माहिती, पुरोहितांसह 6 जणांवरचा मोक्का हटवला ----------------- 2. दुष्काळग्रस्त भारताला खुशखबर, पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून अंदमानात, शेवटच्या आठवड्यात केरळात एन्ट्री, हवामान खात्याचा अंदाज ----------------- 3. लातूरला पाठवलेल्या वॉटर एक्स्प्रेसचं बिल रेल्वेकडून मागे, सर्व स्तरातील टीकेनंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंचा निर्णय ----------------- 4. राज्यसभेच्या 53 खासदारांना निरोप, महाराष्ट्राच्या सहा जागांसाठी लॉबिंग सुरु, सेनेचे संजय राऊत आणि प्रफुल्ल पटेलांची वर्णी लागण्याची शक्यता ----------------- 5. प्रेमविवाह केल्याने मुलीच्या कुटुंबाचा सशस्त्र हल्ला, साताऱ्यातील गजवडीत तणाव, मुलाच्या घरातील 6 जण जखमी ----------------- 6. रिओ ऑलिम्पिकसाठी कुस्तीपटू सुशीलकुमारचं मोदींना पत्र, ऑलिम्पिकसाठी चाचणी घेण्याची मागणी, मोदींच्या भेटीचीही इच्छा ----------------- 7. सौरउर्जेवर चालणारी देशातली पहिली ट्रेन तयार, लाईट आणि पंखे सौरउर्जेवर चालणाऱ्या ट्रेनचा जोधपूर कारखान्यात फर्स्ट लूक ----------------- 8. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा, 15 वेळा रेड कार्पेटवर अवतरणारी ऐश्वर्या पहिली भारतीय ----------------- 9. पहिल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची चुरस एबीपी माझावर, विशेष कार्यक्रम 'दुष्काळाशी दोन हात' आज रात्री 9 वाजता एबीपी माझा वेब टीम
आणखी वाचा























