एक्स्प्लोर

Soybean Rates Today: दुष्काळाने सोयाबीन हिरावलं; एकेका दाण्यासाठी शेतकरी धडपडतोय; तुमच्या बाजारसमितीत सोयाबीनला काय भाव मिळतोय?

मराठवाड्यात मागील खरीप हंगामात 46 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यापैकी 25 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती.

Soybean Rates Today: राज्यभरात दुष्काळाचा दाह वाढला आहे. हातातोंडाशी आलेलं सोयाबीन (Soybean) पाण्याअभावी करपलं. आता मराठवाड्यासह विदर्भात सोयाबीनची खळे सुरु आहेत. शेतकरी हाती लागेल तेवढं सोयाबीन बाजारात नेताना दिसत आहे. आवक प्रचंड घसरली आहे.कृषी पणन विभागाच्या माहितीनुसार, 13 ऑक्टोबर रोजी राज्यात 12 हजार 44 क्विंटल सोयाबीन बाजारपेठेत आलं होतं. मराठवाड्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसलाय. पावसाने दडी मारल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, बीड जिल्ह्यातील हेक्टरी उत्पादन तब्बल 73 टक्क्यांनी घटल्याचं पीक कापणी प्रयोगांच्या प्राथमिक आकडेवारीतून समोर आलंय. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कर्ज फेडायचं कसं, असा प्रश्न निर्माण झालाय.

बीडमध्ये सोयाबीनचं उत्पादन 73 टक्क्यांनी घटलं!

बीड जिल्ह्यात मागील 5 वर्षांत सोयाबीनचं सरासरी हेक्टरी उत्पादन 1,534.2 किलो होतं. मात्र, यंदा हेच उत्पादन अवघं 410 किलो प्रति हेक्टर इतकं राहिलंय. म्हणजेच हेक्टरी उत्पादनात तब्बल 1,124 किलोची घट झाली असून, उत्पादन 73 टक्क्यांहून अधिक घटलंय.मराठवाड्यात मागील खरीप हंगामात 46 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यापैकी 25 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनातील या घटीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

पावसाच्या खंडाचा सोयाबीनला फटका

सोयाबीन हे पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असलेलं पीक आहे. 15 जून ते 15 जुलै या कालावधीत वेळेवर पेरणी, सुरुवातीला जमिनीत पुरेसा ओलावा आणि त्यानंतर नियमित पाऊस मिळणं गरजेचं असतं. मात्र, यंदा मान्सूनचं उशिरा आगमन झालं. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे मोठे खंड पडले. त्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं.

सोयाबीनला किती भाव मिळतोय?

राज्यभरात सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या मोठ्या नुकसानाला समोरं जावं लागत आहे. पावसाभावी पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असून आवकही रोडावली आहे. राज्यभरात 12 ऑक्टोबर रोजी 1 लाख 40 हजार 200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. क्विंटलमागे शेतकऱ्याला 6 हजार 400 ते 6 हजार 800 रुपयांचा दर मिळत आहे.

तुमच्या बाजार समितीत किती दर मिळताहेत?

जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
12/10/2026
अहिल्यानगर --- क्विंटल 28 6300 6541 6420
अहिल्यानगर लोकल क्विंटल 872 6151 6550 6400
अहिल्यानगर पिवळा क्विंटल 161 6100 6550 6400
अकोला पिवळा क्विंटल 6492 6124 6895 6560
अमरावती --- क्विंटल 706 6300 6600 6445
अमरावती लोकल क्विंटल 15757 6100 6503 6301
अमरावती पिवळा क्विंटल 5933 5588 6375 6031
बीड --- क्विंटल 4877 5000 6811 6500
बीड पिवळा क्विंटल 1457 6165 6820 6603
बुलढाणा --- क्विंटल 157 6000 6500 6300
बुलढाणा लोकल क्विंटल 960 6200 6900 6700
बुलढाणा पिवळा क्विंटल 14655 5900 6683 6421
चंद्रपुर --- क्विंटल 2074 4900 6495 6000
चंद्रपुर पिवळा क्विंटल 1869 5751 6391 6122
छत्रपती संभाजीनगर --- क्विंटल 309 5850 6151 6000
छत्रपती संभाजीनगर पिवळा क्विंटल 76 6096 6438 6356
धाराशिव --- क्विंटल 155 6000 6600 6500
धाराशिव नं. १ क्विंटल 10 5000 5500 5000
धाराशिव पिवळा क्विंटल 85 6201 6601 6504
हिंगोली लोकल क्विंटल 825 6150 6645 6397
हिंगोली पिवळा क्विंटल 653 6203 6833 6518
जळगाव --- क्विंटल 3359 5741 6486 6161
जळगाव लोकल क्विंटल 178 6436 6880 6825
जळगाव पिवळा क्विंटल 215 6325 6703 6551
जालना पिवळा क्विंटल 16325 5954 6791 6577
लातूर पिवळा क्विंटल 4945 6074 6726 6557
नागपूर पिवळा क्विंटल 1665 5677 6546 6125
नांदेड --- क्विंटल 129 6301 6613 6475
नांदेड पिवळा क्विंटल 6220 6357 6682 6549
नंदुरबार --- क्विंटल 24 6601 6821 6689
नाशिक --- क्विंटल 5170 4000 6739 6578
नाशिक हायब्रीड क्विंटल 210 3100 6851 6750
नाशिक पिवळा क्विंटल 85 6013 6426 6351
परभणी --- क्विंटल 161 6166 6700 6400
परभणी नं. १ क्विंटल 920 6000 6600 6400
परभणी पिवळा क्विंटल 1448 5833 6727 6533
पुणे नं. २ क्विंटल 51 6550 6600 6600
सांगली लोकल क्विंटल 37 5710 6000 5855
सोलापूर --- क्विंटल 1012 5800 6800 6650
वर्धा पिवळा क्विंटल 11706 5694 6569 6328
वाशिम --- क्विंटल 9805 6375 6902 6634
वाशिम पिवळा क्विंटल 4498 6227 6997 6502
यवतमाळ --- क्विंटल 1250 6390 6725 6590
यवतमाळ लोकल क्विंटल 900 6000 6800 6500
यवतमाळ पिवळा क्विंटल 11862 5992 6537 6277
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 140286  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Amravati Farmer: अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं;पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
अमरावतीत मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यानं स्वतःला विहिरीत झोकून दिलं; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गंभीर दखल, म्हणाले...
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
NCP Merger Sunetra Pawar: संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
संजय राऊतांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीच्या गोटात भूकंप, सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्व आमदारांना पटापट फोन गेले, नेमकं काय घडलं?
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
Embed widget