एक्स्प्लोर

धक्कादायक! 90 शालेय विद्यार्थ्यांसह 101 जणांना कोरोनाची लागण

Coronavirus updates: कर्नाटकमधील एका शाळेतील 90 विद्यार्थ्यांसह 101 जणांना कोविडची लागण झाली आहे.

Coronavirus in Scool :  कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय महागात पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील चिकमंगळूरू जिल्ह्यातील 90 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एका शाळेत इतके कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. 

सीगोडू येथील जवाहर नवोदय शाळेतील 59 विद्यार्थी आणि 10 कर्मचारी अशा एकूण 69 जणांना शनिवारी कोविडची लागण झाली असल्याचे समोर आले. त्यानंतर यामध्ये वाढ होऊन आणखी 21 विद्यार्थी आणि एका कर्मचाऱ्याची कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह चाचणी झाल्यानंतर ही संख्या आता 101 वर पोहोचली आहे.

मोठ्या प्रमाणात कोविड -19 पॉझिटिव्ह प्रकरणे आढळल्यानंतर, जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणाले की शाळा सील केली जाईल आणि पुढील सात दिवसांसाठी बंद राहणार आहे.

शाळेतून एकूण 457 नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी 69 नमुने पहिल्यांदाच पॉझिटिव्ह आले. सोमवारी या आकड्यात वाढ झाली आणि आता शैक्षणिक संस्थेतील 90 विद्यार्थी आणि 11 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असताना दुसरीकडे कर्नाटकमध्ये कोरोना बाधित आढळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. रविवारी, नांजप्पा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेसमध्ये 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. बहुतांशी विद्यार्थ्यांना कोणतीही लक्षणे नसून वसितगृह परिसर सील केला असल्याची माहिती उपायुक्त के.बी. शिवकुमार यांनी दिली. 

पाहा व्हिडिओ: शाळा सुरू करण्याचा निर्णय पुन्हा लांबणीवर? Omicron मुळे शाळांबाबत पुनर्विचार

मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण

ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानंतर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. डोंबिवली आणि पुण्यानंतर आता मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केलाय.  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, आज मुंबईतील दोन जणांना ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचे सिध्द झाले आहे . यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता १० झाली आहे. दक्षिण आफ्रिकाहून 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. या व्यक्तीसोबत राहिलेल्या अन् अमेरिकेतून आलेल्या 36 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे प्रयोगशाळा अहवालातून समोर आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Omicron Variant : राज्य सरकारची प्रवाशांसाठी नवीन कठोर नियमावली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
दुबईमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना IPF MahaHelpline ची मदत; 500 जण सुखरुप मायदेशी
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु
मिशेल सँटनरचं चिथावणीखोर वक्तव्य, कर्णधार सूर्यकुमार यादवचं चोख प्रत्युत्तर, फायनल सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget