एक्स्प्लोर
महाकौशल एक्सप्रेसला अपघात, 8 डब्बे रुळावरुन घसरले
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या महोबा येथे महाकौशल एक्सप्रेसला मध्यरात्री अपघात झाला असून तब्बल 8 डब्बे रुळावरुन घसरले. जबलपूरहून दिल्लीला चाललेल्या या एक्सप्रेसला उत्तर प्रदेशमधील महोबा इथं रात्री 2.30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. एक्सप्रेसचे सर्वात मागचे डब्बे रुळावरुन घसरले. यामध्ये चार एसी डब्बे, एक स्लीपर आणि दोन जनरल डब्ब्यांचा समावेश आहे.
ही ट्रेन तात्काळ खाली करण्यात आली आहे. तसंच मेडिकल ट्रेन देखील घटनास्थळी पाठवण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं नेमकं कारण अदयाप समजू शकलेलं नाही.
या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली असून महाकौशल एक्सप्रेसचाही मार्ग बदलण्यात आला आहे.
कोणकोणते डब्बे घसरले
4 एसी डब्बे: B1, B2, A1, HA1 हे डब्बे रुळावरुन घसरले.
2 जनरल डब्बे रुळावरुन घसरले आहेत.
1 पार्सल डब्बा देखील रुळावरुन घसरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement