7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर; 18 महिन्यांचा महागाई भत्यावर लवकरच निर्णय होणार
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा गेल्या 18 महिन्यांपासूनचा रोखण्यात आलेला महागाई भत्ता या दिवाळीच्या आत मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या गेल्या 18 महिन्यांपासूनचा रोखलेल्या महागाई भत्त्यावर (Dearness Allowance-DA) लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. महागाई भत्त्याचा प्रलंबित असलेला प्रश्न आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर गेला आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर यावर निर्णय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर देणार असल्याची चर्चा सुरु आहे.
पेन्शनर्स मंचने लिहिले पत्र
भारतीय पेन्शनर्स मंचने एक पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रलंबित असलेला महागाई देण्याची विनंती केली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मे 2020 पासून 30 जून 2021 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 1 जुलै 2021 नंतर तो पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून तो आता 28 टक्के इतका करण्यात आला आहे. या आधी तो 11 टक्के इतका होता. वाढत्या महागाईमुळं वस्तूंच्या किमती देखील वाढत जातात. त्यामुळं लोकांजवळ असलेल्या पैशांची क्रय क्षमता कमी होत जाते. यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मदत होते.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर पेन्शनधारक लोकांना लाभ होणार आहे. देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरील वाढता ताण पाहता महागाई भत्ते वाढवण्यावर निर्बंध आणले होते. मागील वर्षी कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दोन हफ्त्यात देण्यावर बंदी आणली होती. महागाई भत्त्याचे हफ्ते प्रत्येक सहा महिन्याला दिले जातात. पहिला हप्ता 1 जानेवारीला तर दुसरा हप्ता 1 जुलैला दिला जातो.
महत्वाच्या बातम्या :
- ...आता Jio Down; 'रिलायन्स जिओ'ला नेटवर्क नाही, लाखो यूजर्स हैराण
- RBI Monetary Policy : सामान्यांना व्याजदरात सूट मिळणार का? RBI ची आजपासून बैठक सुरु
- Crypto Fever : बिटकॉईन टिक्का, इथेरियम बटर चिकन आणि बरचं काही... दिल्लीतील हॉटेलमध्ये बिटकॉईनने भरा बिल
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















