एक्स्प्लोर
जयललितांच्या निधनाच्या धक्क्याने 77 जणांचा मृत्यू
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाने तामिळी जनतेला शोक अनावर झाला आहे. अम्मांच्या मृत्यूचा आघात सहन न झाल्यामुळे 77 जणांनी प्राण गमावल्याची माहिती एआयडीएमके पक्षाने दिली आहे.
एआयडीएमके पक्षाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पक्षातील एका अधिकाऱ्याने प्राणत्याग करण्याचा प्रयत्न केला असून त्यांनाही 50 हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे.
केंद्राकडून मात्र मृतांचा आकडा 30 असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये चार आत्महत्यांचा समावेश आहे. एआयडीएमकेच्या पत्रकात 77 जणांच्या मृत्यूचा कालावधी स्पष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे हे मृत्यू जयललितांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं तेव्हापासून (22 सप्टेंबर) आहेत, की त्यांना आलेल्या कार्डिअॅक अरेस्टनंतर, हे समजू शकलेलं नाही. मात्र तामिळनाडूच्या विविध भागात राहणाऱ्या 77 जणांची नावं नमूद करण्यात आली आहेत.
गेल्या महिन्यापासून जयललिता फुफ्फुसाच्या विकारामुळं अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तामिळनाडू राज्य शोकात बुडालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement