एक्स्प्लोर

5G service : भारतातील 13 शहरात लवकरच 5G सेवा सुरु होणार, मुंबई-पुण्याचा समावेश

5G service will soon : 26 जुलै 2022 रोजी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे.

5G commercial roll out :  केंद्र सरकारने 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला मंजुरी दिली आहे. दूरसंचार विभाग (DoT) या आठवड्यात लिलावासाठी अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. सुत्रांच्या वृत्तानुसार, 26 जुलै 2022 रोजी 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 9 स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची योजना आखली आहे. हा लिलाव 20 वर्षांसाठी असेल. यामध्ये 600, 700, 800, 1,800, 2,100, 2,300 आणि 2,500 मेगाहर्ट्झ बँडचा लिलाव होणार आहे. या लिलावासाठी स्पेक्ट्रमची एकूण किंमत 5 लाख कोटी रुपये ठेवण्यात आल्याचं समजतेय. या 5G सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. केंद्र सरकारने 5G सेवा 4G च्या तुलनेत 10 पट वेगवान असेल, असा दावा केलाय.  

आता तुम्ही विचार करत असाल की देशात 5G सेवा कधी सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये 5G सेवा सुरु होऊ शकते, असे भारताच्या दूरसंचार विभागाने (DoT) याआधी सांगितले होते. काही महत्वाच्या शहरांमध्ये सर्वात आधी 5G सेवा सुरु करण्यात येणार असल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले होते. दरम्यान, भारतामध्ये सध्या अनेक ठिकाणी 4G सेवाही उपलब्ध नाही. पण देशात 5G ची चाचपणी सुरु करण्यात आली आहे. पाहूयात देशात सर्वात आधी कोणत्या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.  

या 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा सुरु होणार - 
दूरसंचार विभागाच्या (DoT) माहितीनुसार, देशभरात 13 शहरात सर्वात आधी 5G सेवा उपलब्ध होणार आहे. या 13 शहरांमध्ये अहमदाबाद, बेंगळुरु(Ahmedabad, Bengaluru), चंडीगढ, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे (Mumbai, Pune) या शहरांचा समावेश आहे.  

दरम्यान, देशात सर्वात आधी कोणती टेलिकॉम कंपनी कमर्शिअल पद्धतीने 5G सेवा सुरु करेल, याबाबत अद्याप ठोसपणे सांगणे कठीण आहे. जिओ, एअरटेल अथवा व्होडाफोन-आयडिया यापैकी कोणतीही कंपनी असू शकते. याआधी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी भारतामध्ये कमर्शिअल पद्धतीने 5G सेवा होऊ शकते असे वृत्त आले होते. पण नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार, स्पटेंबर 2022 पर्यंत 5G ची वाट पाहावी लागणार आहे. 
 
ट्रायची 20 वर्षांच्या वैधतेवर सहमती
दूरसंचार विभाग लिलावासाठी स्पेक्ट्रमच्या 20 वर्षांच्या वैधतेच्या बाजूने आहे, कारण ट्रायने 20 वर्षांच्या आधारावर राखीव किंमतीची गणना केली होती. या वर्षी एप्रिलमध्ये 5G-संबंधित शिफारशींमध्ये, संबंधित बँडच्या संदर्भात 30 वर्षांसाठी स्पेक्ट्रम वाटपाची राखीव किंमत स्पेक्ट्रम वाटपाच्या राखीव किंमतीच्या 1.5 पट आहे जी 20 वर्षे असावी असं  भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) म्हटले होते.

5G स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित 
भारत सरकार या वर्षी ऑगस्टपर्यंत स्वदेशी विकसित 5G तंत्रज्ञान लॉन्च करू शकते असे संकेत दूरसंचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिले होते. UN ची संस्था ITU ने जिनिव्हा येथे आयोजित केलेल्या वर्ल्ड समिट ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS) 2022 मध्ये बोलताना त्यांनी ही टिप्पणी केली. दूरसंचार तंत्रज्ञानाच्या विकासासाठी सरकार संशोधन आणि विकास निधी सुरू करत आहे. महत्त्वाचे म्हणजे, IT प्रमुख TCS आणि सरकारी मालकीची दूरसंचार संशोधन संस्था CDoT स्वदेशी 5G तंत्रज्ञान विकसित करण्यात गुंतलेली आहेत अशी माहिती आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget