(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Indian Influential Muslims: जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लिमांची यादी जाहीर; भारतीय मौलाना महमूद मदनींचाही समावेश
The 500 Most Influential Muslims: जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींची यादी जाहीर. भारतातील जमीयत उलेमा-ए-हिंद चे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांचाही समावेश.
500 Most Influential Muslims in world maulana mahmood madani also listed: जगातील 500 सर्वात प्रभावशाली मुस्लिम व्यक्तींची यादी (The 500 Most Influential Muslims) जाहीर समोर आली आहे. यामध्ये भारतातील जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी (Maulana Mahmood Madani) यांचाही समावेश आहे. जॉर्डनच्या एनजीओ 'द रॉयल ऑल अल बैत इंस्टीट्यूट फॉर इस्लामिक थॉट'ने (RABIIT) तयार केलेल्या यादीत मौलाना मदनी 15 व्या स्थानावर आहेत. सौदी अरेबियाचे सुल्तान, 'सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद' या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. तर सौदीचे कट्टर विरोधक इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अली खामेनेई दुसऱ्या स्थानावर आहेत. तालिबान, हिजबुल्लाह अशा अतिरेकी संघटनांशी संबंधित लोकांचाही या यादीत समावेश.
कोण आहेत महमूद मदानी?
मौलाना महमूद मदनी यांचं नाव जगातील सर्वात प्रभावशाली मुस्लीम व्यक्तींच्या यादीत 15 व्या क्रमांकावर आहे. गुजरात भूकंपानंतरच्या कार्यामुळे मदनी प्रकाशझोतात आले होते. देशात 40 पेक्षा जास्त ठिकाणी अतिरेकी विरोधी कार्यक्रमांचंही त्यांनी आयोजन केलं आहे. सीएए विरोधी आंदोलनातही हिरीरीने त्यांचा सहभाग होता. मदानी यांचा जन्म तीन मार्च 1964 रोजी उत्तर प्रदेशमधील देवबंद येथे झाला होता. मदानी यांचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होतो. मदनी यांचं शिक्षण दारुल उलूम देवबंद इस्लामी मदरसामध्ये झालेय. 1992 मध्ये त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बिजनेस फील्डमध्ये त्यांनी करिअर करण्यासाठी पाऊले उचलली. पण काही कालावधीनंतर त्यांनी समाजसेवा आणि राजकीय क्षेत्रात कार्य करण्याचं ठरवलं.
गुजरातमधील भूकंपानंतर मिळाली ओळख -
अनेक दिवस सामाजिक कार्य करणाऱ्या मदानी यांनी 2001 मधील गुजरात भूकंपानंतर ओळख मिळाली. भूकंपानंतर मदानी यांनी बचाव कार्य आणि पुनर्वसन करण्यासाठी जिवाचं रान केले होतं. 2002 मध्ये झालेल्या दंगलीनंतर जमीयत उलेमा-ए-हिंद ने मौलाना महमूद मदनी यांच्या नेतृत्वात मदतकार्य करण्यासाठी अभियान चालवलं. या कार्यमुळे मदानी प्रकाशझोतात आले अन् त्यांना राष्ट्रीय ओळख मिळाली.
सपामधून राजकीय प्रवास -
मौलाना महमूद मदनी यांनी आपल्या राजकीय प्रवासाठी सुरुवात समाजवादी पार्टीमधून केली होती. 2006 ते 2012 पर्यंत उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेय.
10 प्रभावशाली मुस्लीम व्यक्ती कोण? -
1.किंग सलमान बिन अब्दुल-अजीज अल-सऊद
2.अयातुल्लाह अली खामेनेई
3.तमीम बिन हमाद अल थानी
4.रेचेप तैयप एर्दोगन
5.किंग अब्दुल्ला द्वितीय इब्न अल-हुसेन
6.न्यायमूर्ति शेख मोहम्मद तकी उस्मानी
7.किंग मोहम्मद VI
8.शेख मोहम्मद बिन जाएद अल-नाहयान
9.अयातुल्ला सैय्यद अली हुसैन अल सिस्तानी
10.मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुल-अजीज अल-सऊद