50 years of Bangladesh :  नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून बांग्लादेशच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. 15 ते 17 डिसेंबर दरम्यान राष्ट्रपती कोविंद बांग्लादेश दौऱ्यावर असतील अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंखला यांनी मंगळावारी दिली. ढाका येथे बांग्लादेश आपला 50 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. बांग्लादेशाच्या राष्ट्रपतींनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याबातचे आमंत्रण दिले आहे.


बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना आणि बांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. एके. अब्दुल मोमेन हे राष्ट्रपतींसोबत चर्चा करतील. राष्ट्रपती कोविंद यांच्यासोबत शिक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष सरकार आणि खासदार राजदीप रॉय हे सुद्धा असतील. बांग्लादेशसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. 16 डिसेंबर दिवस हा पाकिस्तानी सेनेवर मिळविलेला महान विजयाचा दिवस आहे. 16 डिसेंबर 1971 हा दिवस बिनशर्थ पाकिस्तानच्या सैन्याने पत्करलेल्या शरनागतीची आठवण करून देतो.
 
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंखलान यांनी सांगितले की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत भारतातून एक वरिष्ठ शिष्टमंडळही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाईल. 


बीएसएफने सूरू केली मैत्री सायकल रॅली
बांग्लादेशाच्या 50 व्या मुक्तिसंग्राम दिवसानिमित्त भारतीय सुरक्षा दल (BSF) पश्चिम बंगालमध्ये भारत-बांग्लादेश सीमेवर मैत्री सायकल रॅली सुरू करणार आहे. या रॅलीला  सिलीगुडीच्या कदमतल्लामध्ये बीएसएफच्या उत्तर बंगाल फ्रंटियर मुख्यालयापासून रविवारी महानिरीक्षक (IG) रवी गांधी यांनी हिरवा झेंडा दाखवला. बीएसएफने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेले बीएसएफचे जवान भारत-बांग्लादेशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर 550 किलोमीटरचे अंतर सर करतील आणि 20 डिसेंबर रोजी उत्तर 24 परगना जिल्ह्यात आईसीपी, पेट्रोपल, दक्षिण बंगाल फ्रंटियर, कोलकत्तामध्ये त्याचा समारोप होईल. 


या सायकल रॅलीमध्ये 15 सायकलस्वार (दहा पुरूष आणि पाच महिला) सहभागी होतील. असेही हर्षवर्धन यांनी सांगितले.  


इतर बातम्या