Ola Scooter : 'गड्डी निकल चुकी' या कॅप्शनसह ट्विट करून, ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ओला एस1, एस1 प्रो दुचाकींची डिलेव्हरी केव्हा केली जाणार? याची माहिती दिली आहे. Ola S1 स्कूटरची डिलिव्हरी उद्यापासून म्हणजे 15 डिसेंबर 2021 पासून सुरू होणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर फ्युचरफॅक्टरी येथे डिलिव्हरीसाठी तयार असल्याचा व्हिडिओ अग्रवाल यांनी शेअर केला आहे. ज्यामध्ये व्हिडिओच्या शेवटी ओला इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन जाणारा ट्रक फायन डिलिव्हरीसाठी कारखाना सोडताना दिसत आहे.

स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी विशेष वेळापत्रक

ग्राहकांना पोस्ट-बुकिंग डिलिव्हरीमध्ये विलंब झाल्याबद्दल आणि त्यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल ओलाच्या सीईओंनी आभार मानले आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या तामिळनाडूतील फ्युचरफॅक्टरीमध्ये तयार केली जात आहे. दरम्यान भाविश यांनी ओला स्कूटरच्या ग्राहकांचे ट्विट देखील शेअर करत, संबधित ग्राहकाची ओला एस1 प्रोची डिलिव्हरी 15 डिसेंबरला होणार असल्याचे सांगितलं आहे. बंगळुरु येथे पहिल्या 50 S1 Pro ग्राहकांसाठी विशेष वितरण कार्यक्रम पार पडणार आहे.  



OLA इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत किती?

Ola Electric ने Ola S1 आणि Ola S1 Pro नावाच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत. या स्कूटरची किंमत 85 हजार ते 1.10 लाख रुपयांपर्यंत आहे. Ola S1 ची किंमत महाराष्ट्रात 94,999 रुपये, राजस्थानमध्ये 89,968 रुपये आणि गुजरातमध्ये 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. जर आपण Ola S1 Pro बद्दल बोललो तर त्याची किंमत महाराष्ट्रात 1,24,999 रुपये, गुजरातमध्ये 1,09,999 रुपये आणि राजस्थानमध्ये 1,19,138 रुपये ठेवण्यात आली आहे.


OLA S1 Pro आणि OLA S1 मायलेज

ओला इलेक्ट्रिकने नवीन बॅटरी पॅकसह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस1 आणि ओला एस1 प्रो मेनको लॉन्च केले आहेत. Ola S1 मध्ये 2.98 kWh चा बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे तर Ola S1 Pro स्कूटरमध्ये 3.97 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. Ola S1 पूर्ण चार्ज केल्यावर 120 किमीपर्यंत चालवता येते असा दावा करण्यात आला आहे शिवाय त्याचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे. Ola S1 Pro एका चार्जवर 180 किमी पर्यंत चालवता येतो. त्याचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha