New MG Motor EV : MG Motor बाजारात नवी कार आणण्याच्या तयारीत आहे. एमजी मोटरने नव्या MG Motor EV ची घोषणा केली आहे. ही नवी SUV आधीच्या ZS EV चे अपडेट वर्जन असणार आहे. या नव्या EVची किंमत 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत असेल. ही नवी SUV इलेक्ट्रिक क्रॉसओवर असेल आणि जागतिक बाजारपेठेनुसार अपडेट फिचरसह भारतीयांसाठी स्थानिक पातळीवर तयार झालेली कार असेल. 


ईव्हीचे स्थानिकीकरण खूप महत्वाचे आहे. महागड्या बॅटरी आणि इतर घटकांमुळे EV कारची किंमत अधिक आहे. मात्र, कारच्या स्थानिकीकरणामुळे खर्च आणि किंमत कमी होण्यास मदत होईल. बॅटरी, मोटर आणि इतर भाग MG द्वारे स्थानिकीकृत केले जातील आणि अधिक विद्युत गतिशीलता देण्यावर भर देण्यात येईल.


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रेणी (Range), डिझाईन (Design) आणि इतर फिचर भारतातील रस्त्यांवर चालण्यायोग्य बनवले जातील आणि आवड लक्षात घेऊन डिझाईन केले जातात. याची किंमत श्रेणी Tata Nexon EV सारखीच असली तरी, MG EV क्रॉसओवर ZS सारखी किंवा उच्च श्रेणी देईल, अशी आमची अपेक्षा आहे. नवीन MG EV मध्ये फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात येईल. याच्या चार्जिंग नेटवर्कसंदर्भात अधिकचा अभ्यास करावा लागणार आहे.


वाढत्या इंधनाच्या खर्चाला, EV हे एक उत्तर असून त्यातच परवडणारी EV ला लोकांची पसंती मिळेल. MG कडे सध्या ZS असून हि कार जास्त किंमतीच्या श्रेणीमधील असूनही त्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. आगामी काळात परवडणारी ईव्ही ग्राहकांच्या अधिक पसंतीस उतरेल.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha


Car loan Information:

Calculate Car Loan EMI