एक्स्प्लोर

आजपासून हॉटेलिंग स्वस्त, बिलावर 5 टक्केच जीएसटी!  

आजपासून हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबई : तुमच्या हॉटेलच्या आजपासून (बुधवार) बिलात बऱ्यापैकी कपात होणार आहे. कारण आज सकाळपासून हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे. ते मुंबई बोलत होते. कोणत्याही हॉटेलचालकाने 5 टक्क्यांपेक्षा अधिक जीएसटी आकारल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही बापटांनी दिला आहे. याआधी वेगवेगळ्या क्लासच्या हॉटेल्सना वेगवेगळा जीएसटी लावण्यात आला होता. 9 टक्क्यांपासून 28 टक्क्यांपर्यंत जीएसटी लागल्याने चहूबाजूने टीका सुरु झाली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकारच्या हॉटेलना सरसकट 5 टक्के जीएसटी लागणार असल्याचं घोषित केलं. त्याची अंमलबजावणी तातडीने होणार आहे. अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती : ‘हॉटेलात 18 टक्क्यांहून 5 टक्क्यांवर जीएसटीची अंमलबजावणी आजपासून सुरु होणार आहे. हॉटेल मालक किंवा विक्रेते व्हॅट कमी न करता वर जीएसटी लावत होते. यामुळे ग्राहकांची फसवणूक सुरु होती. मात्र, आजपासून हॉटेलमधील दर पत्रकात बदल करणं आवश्यक असेल. जे हॉटेल मालक दर कमी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी सरकार हेल्पलाईन नंबर 1800225900 सुरू करणार आहे.’ अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली. या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला हॉटेलिंगवर तब्बल 18 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. याबाबत बरीच नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे आता सरकारनं 18 टक्क्यांवरुन जीएसटी थेट 5 टक्क्यांवर आणला आहे. ‘MRPवर जीएसटी लागू शकत नाही’ ‘टॅक्स कमी झाला म्हणून दरपत्रक वाढवून अधिकचे दर लागू केले जाऊ नये. तसेच MRPवर जीएसटी लागू शकत नाही. याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.’ असंही गिरीश बापट यावेळी म्हणाले. ‘विनापरवानगी काही बदल केल्यास कारवाई करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जुन्या मालावर नव्या दरानुसार स्टिकर लावण्यात यावेत. हॉटेल, मेडिकल दुकाने व इतर दुकाने याठिकाणी सरकारनं सुरु जीएसटीसाठी सुरु केलेल्या हेल्पलाइनचा नंबर दर्शनी भागात लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच जीएसटी नंबर ही समोर लावले जावेत. MRPचे लेबल लावून कमी झालेले दर नोंदवणे सक्तीचे आहे.’ अशीही माहिती यावेळी गिरीश बापट यांनी दिली. संंबंधित बातम्या : खवय्यांना दिलासा, हॉटेलमधील जेवणावरचा जीएसटी 18 वरुन 5 टक्क्यांवर 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर! गुवाहाटीत GST काऊन्सिलची बैठक, मोठ्या बदलांची शक्यता

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
जर अमेरिका आणि पाकिस्तान युद्ध झालं तर आपण पाकिस्तानसोबत राहावं, कारण ते आपले शेजारी, राजस्थान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ व्हायरल
अमेरिका- पाकिस्तान युद्ध झाल्यास आपण पाकिस्तानसोबत, ते आपले शेजारी : मदन राठोड
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल
जे टीका करतात त्यांच्याच काळात EVM भारतात आलं, विरोधकांकडून बिनकामाचे राजकारण सुरु, प्रफुल पटेलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Baramati News: विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
विद्या प्रतिष्ठानच्या वर्धापनदिन; शरद पवार गाडीतून उतरताच जय पवार पुढे आले, पाया पडले, आजोबांनी नातवाच्या पाठीवर थाप टाकली, आशीर्वाद दिला अन्...
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Embed widget