India Blocks YouTube Channels : मोदी सरकारने आणखी 35 यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. सूचना प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त संचिव (P&A) विक्रम सहाय म्हणाले की, 20 जानेवारीला गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर 35 यूट्यूब चॅनेल, दोन ट्विटर अकाऊंट, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले आहे.
या अगोदर 19 जानेवारीला माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, भारताविरोधी प्रचार करणाऱ्या आणि खोट्या बातम्या (Fake News) चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मला सांगताना आनंद होतो की जगातील अनेक देशांनी याचे अनुकरण केले आहे. युट्यूब देखील पुढे आले असून त्यांनी ब्लॉक केले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिसेंबर महिन्यात गुप्तचर यंत्रणेसह 20 यूट्यूब (YouTube) चॅनेल आणि 2 वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. कारण यातील बहुतेक मजकूर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील होता. वस्तुस्थितीनुसार तो चुकीचा होता. त्यामुळे सरकारने आपत्कालीन अधिकारांचा वापर करून चॅनेल आणि वेबसाइट्सना ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.
मंत्रालयाने म्हटले आहे की, काश्मिर प्रश्न, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, शेतकरी आंदोलन, सीडीएस (CDS)जनरल बिपिन रावत इत्यादी विषयांवर चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवण्यासाठी या चॅनेलचा वापर केला जात होता. त्यामुळे कारवाईचे आदेश दिले आहेत.
या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेतकरी आंदोलनाबद्दल देखील चुकीच्या बातम्या देण्यात आल्या होत्या. तसेच , नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याशी संबंधित निदर्शने आणि भारत सरकारच्या विरोधात अल्पसंख्याकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भात खोट्या बातम्या देण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय सुरक्षेचा दृष्टीने ही कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे केंद्राने म्हटले आहे. आगामी 5 राज्यांतील निवडणुकांमध्ये लोकशाही प्रक्रियेला या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खीळ घालण्याची भीती देखील भारत सरकारने व्यक्त केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते, जो बायडेन आणि बोरिस जॉन्सन यांना टाकलं मागे
- वडिलांच्या संपत्तीवर चुलत भावांपेक्षा मुलींचा अधिकार जास्त; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
- China Artificial Moon : सूर्यानंतर आता चंद्र देखील मेड इन चायना; चीननं तयार केला कृत्रिम चंद्र
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha