Sputnik V on Omicron Variant : एका अभ्यासात असे आढळून आले आहे की स्पुटनिक व्हीचे (Sputnik V) दोन डोस फायझर (Pfizer) लसीच्या दोन डोसच्या तुलनेत कोविड-19 च्या ओमायक्रॉन व्हेरियंटला निष्प्रभ करण्यासाठी दुप्पट प्रभावी आहेत. गामालिया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) या संस्थेनी गुरुवारी ही माहिती दिली. इटालियन स्पॅलान्झानी इन्स्टिट्यूटमध्ये स्पुटनिक व्ही आणि फायझर लस घेतलेल्या व्यक्तींकडून मिळवलेल्या नमुन्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.
गॅमलिया सेंटर आणि स्पॅलान्झानी इन्स्टिट्यूटच्या संयुक्त अभ्यासाने डिसेंबर 2021 मध्ये प्रकाशित केलेल्या वेगळ्या अभ्यासात मिळालेल्या निकालांची पुष्टी केली. गॅमलिया केंद्राचे संचालक अलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "ठोस वैज्ञानिक माहिती हे सिद्ध करते की स्पुटनिक व्ही मध्ये इतर लसींच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरियंटला निष्प्रभावी करण्याची क्षमता अधिक आहे आणि ही लस या नवीन संसर्गजन्य स्वरूपाविरुद्ध जागतिक लढ्यात मदत करेल.
संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार गॅमालियाने सांगितले की, अभ्यासाच्या निष्कर्षांचा हवाला देत, गॅमालिया सेंटर आणि आरडीआयएफने (RDIF) सांगितले की मिश्र आणि जुळणी (Mix and Match) दृष्टिकोना अंतर्गत, स्पुटनिक लस ओमायक्रॉन व्हेरिंयटसह कोविड-19 विरूद्ध एमआरएनए लसींची कमी प्रभावीता सुधारण्यास मदत करू शकते. स्पुटनिक व्ही लस गॅमलिया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी आणि आरडीआयएफद्वारे विकसित करण्यात आलेली लस आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Sushant Singh Rajput Birthday : कशी सुरु झाली सुशांत आणि रियाची लव्हस्टोरी, जाणून घ्या...
- मागील तीन महिन्यात सोशल मीडियावर सांप्रदायिक ध्रुवीकरणाच्या पोस्ट वाढल्या : गुप्तचर विभाग
- Ghana Explosion : घानामध्ये भीषण स्फोट; 17 ठार, 59 जखमी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha