Priyanka Gandhi On UP CM Candidate : उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर केलेला नाही. मात्र काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी याच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असण्याची चर्चा रंगलीय. त्यातच प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केलंय. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी प्रियंका गांधी यांना विचारला. त्यावेळी  मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून दुसरा कोणता चेहरा दिसतोय का असं उलटसवाल प्रियंका गांधी यांनी विचारला. त्यामुळे प्रियंका गांधीच उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. 


उत्तर प्रदेशच्या तरुणांसाठी काँग्रेसने घोषणापत्र जाहीर केलंय. उत्तर प्रदेशच्या तरुणांसाठी वीस लाख सरकारी नोकऱ्यांचं आश्वासन काँग्रेसने दिलंय. यापैकी आठ लाख नोकऱ्या महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आलंय. उत्तर प्रदेशच्या तरुणांसोबत संवाद साधत त्यांचे विचार घोषणापत्रात सामील करण्यात आलेत. 


कॉंग्रेसने म्हटले आहे की, उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचे सरकार आले तर परीक्षेचे कँलेंडर जाहीर करण्यात येईल आहे. यामध्ये भरतीच्या जाहिराती, नियुक्ती करण्यात येणाऱ्या तारखा या विषयी माहिती देण्यात येणार आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. कॉंग्रेसने मल्लाहो आणि निषाद या अनुसुचीत जमातीसाठी विश्वस्तरीय संस्थान बनवण्यात येणार असून यामध्ये युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  तसेच मागसलेल्या जमातीच्या तरूणांना आपला व्यवसाय  सुरू करण्यासाठी 1 टक्के व्याजाने कर्ज देण्यात येणार आहे. 


 काँग्रेस पक्षानं आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी त्यांच्या 41 उमेदवारांची दूसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 महिला उमेदवारांनी तिकीट देण्यात आले आहे. प्रियांका गांधी यांनी 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची घोषणा केली होती.  या आधी  काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर केली होती. या यादीमध्ये 50 महिला उमेद्वारांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha