PM Modi Global Approval Rating : देशातील कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म 'द मॉर्निंग कन्सल्ट'च्या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (American President Joe Biden) आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Britain President Boris Johnson) यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.


पंतप्रधान मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 71 टक्के
सर्वेक्षणात पीएम मोदींचे अप्रूव्हल रेटिंग 71% आहे. 13 ते 19 जानेवारी दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान जगातील अनेक राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या तुलनेत खूप पुढे आहेत. PM मोदींनी लोकप्रियतेच्या आलेखात मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी, जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना मागे टाकले आहे. या सर्वेक्षणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सहाव्या तर ब्रिटनचे पंतप्रधान 13व्या क्रमांकावर आहेत.


पंतप्रधान मोदी जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी - 71 टक्के
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर - 66 टक्के
इटलीचे पंतप्रधान मारिया द्राघी - 60 टक्के
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा - 48 टक्के
जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ - 44 टक्के
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन - 43 टक्के
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो - 43 टक्के
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन - 41 टक्के
स्पेनचे अध्यक्ष पेड्रो सांचेझ - 40 टक्के
कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-ए - 40 टक्के


अमेरिकन डेटा इंटेलिजेंस फर्म द मॉर्निंग कन्सल्ट प्रत्येक देशातील प्रौढांचे सर्वेक्षण करून ही क्रमवारी तयार करते. नोव्हेंबरमध्ये झालेल्या शेवटच्या सर्वेक्षणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सर्वाधिक होती.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha