नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात देशभरात 1396 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील रुग्णांचा आकडा आता 27 हजार 892 वर गेला आहे. आत्तापर्यंत 6 हजार 184 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

1396 new positive cases reported in last 24 hrs, takes our total confirmed cases to 27,892. 20,835 people are under active medical supervision. 381 patients are found cured in past 1 day. Total no. of cured people becomes 6184. Recovery rate 22.17%: Joint Secy, Health Ministry pic.twitter.com/BSKSQ8HYTg

— ANI (@ANI) April 27, 2020

आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल म्हणाले, "कोरोनाबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नका. कोरोनाच्या संक्रमणासाठी कोणत्याही एका धर्माला जबाबदार धरू नका. हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा आदर करा".

याशिवाय 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 85 जिल्ह्यात मागील 14 दिवसांपासून एकही कोरोनाचा रूग्ण आढळला नाही. तसेच भारतात 16 जिल्हे असे आहेत की, गेल्या 28 दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रूग्ण आढळले नाही. या यादीमध्ये महाराष्ट्रातील गोंदिया, कर्नाटकतील दावणगेरे आणि बिहारमधील लखीसराय या 3 नविन जिल्ह्यांचा समावेश झाला आहे.

Vaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहिती



संबंधित बातम्या :