प्रश्न- मागील काही दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे, अशा परिस्थिती काय काळजी घ्यावी?
डॉ. मधुकर गायकवाड - या काळात सर्दी, खोकला, व्हायरल इण्फेकशन सारखे आजार होतं असतात. याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. यासोबतच डेंग्यू, मलेरिया आणि कमी प्रमाणात लेप्टो स्पायरसीस सारखे आजार होतं असतात. या काळात त्वचेचे रोग देखील होण्याची शक्यता जास्त असते.
प्रश्न- या काळात भूक वाढण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याबाबत काय सांगाल ? आपला आहार कसा असावा ?
डॉ. मधुकर गायकवाड - साधा आहार असावा, तिखट अन्न टाळावं, पालेभाज्या खाण्यावर भर द्यावा. यासोबतच व्यायाम करण्यावर भर द्यावा. त्वचेचे आजार टाळण्यासाठी कोरडी कपडे वापरावीत.
प्रश्न- आंघोळीसाठी गरम पाणी घेण्याचं प्रमाण जास्त असतं ते कसं असावं ? काय अपाय होऊ शकतात ?
डॉ. मधुकर गायकवाड - जास्त थंडी आहे म्हणून जास्त गरम पाणी अंगावर घेणं टाळाव. जादा गरम पाणी अंगावर घेण्यामुळे कार्डयाकचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कदाचित हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो
प्रश्न- व्यायाम कसा करावा ? विशेषता दमा असणाऱ्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी ?
डॉ. मधुकर गायकवाड - ज्यांना दमा आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. त्यांनी या काळात सर्दी, खोकला झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं.
प्रश्न- या काळात शरीरात कोणते रासायनिक बदल होतात ?
डॉ. मधुकर गायकवाड - थंडीत घाम कमी येतो त्यामुळे शरीरातून विषारी घटक घामावाटे बाहेर जाण्याचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे त्वचेचे आजार होऊ शकतात. आशा काळात नागरिकांनी व्यायाम करणं गरजेचं असतं. जेणेकरून घामावाटे टाकाऊ घटक शरीरातून बाहेर पडतील.
संबंधित बातम्या
राज्यात तापमानाचा पारा घसरला, नाशिक-मुंबईकरांना हुडहुडी, निफाडचे तपमान 2.4 अंशावर
Mumbai temperature | मुंबईत पारा घसरला, मुंबईकरांना हुडहुडी | ABP Majha
महाराष्ट्र गारठला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल
Special Report | थंडीत रक्तवाहिन्यांचं आकुंचन, हार्ट अटॅकचा धोका, कशी काळजी घ्याल?