Mumbai temperature | मुंबईत पारा घसरला, मुंबईकरांना हुडहुडी | ABP Majha
Continues below advertisement
नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. त्यामुळे मुंबईकर सध्या थंडीचा सुखद अनुभव घेत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. आज मुंबईचं तापमान 21 अंश सेल्सिअस इतक नोंदवण्यात आलं आहे. सध्या किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे सकाळी आणि सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात गार वारे वाहत असून, मुंबईकरांना थंडी अनुभवता येत आहे.
Continues below advertisement