एक्स्प्लोर

Horoscope Today 18 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 18 February 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास असणार आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 18 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 18 फेब्रुवारी 2024, रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... 

मेष (Aries Horoscope Mesh Rashi Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस साधारण राहील. आज तुम्हाला घरात कामाचा अधिक भार जाणवेल आणि यामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवेल. व्यवसायिकांना आज व्यवसायात जास्त फायदा होईल. व्यावसायिकांनी ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, तरच तुमचा व्यवसाय पुढेही चांगला चालेल. आज तुमच्या कुटुंबात काही वाद उद्भवू शकतात, आज तुम्ही कौटुंबिक स्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, परंतु थोडा डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो.

वृषभ (Taurus Horoscope Vrushabh Rashi Today)

वृषभ राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. रविवारच्या सुट्टीमुळे तुमचा आजचा दिवस निवांत जाईल. व्यावसायिकांचा आजचा दिवस नफ्याचा असेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन योजना आखताना बिझनेस पार्टनरचा सल्ला घ्यावा. आज तुम्ही कुटुंबासोबत तुमची आवडती वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात जाऊ शकतात, परंतु तिथे तुमचा खर्च वाढू शकतो. आज तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घ्या. सकाळी नियमित व्यायाम करण्याची सवय लावा.

मिथुन (Gemini Horoscope Mitun Rashi Today)

मिथुन राशीच्या नोकरदारांना आज व्यवसायात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज ज्यांचं ऑफिस असेल त्यांना त्यांचे वरिष्ठ तुम्हाला काही अवघड काम देऊ शकतात, जे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत घ्यावी लागेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर व्यावसायिक भागीादाराशी योग्य समन्वय साधा, तरच तुमचा व्यवसाय चांगला चालेल. मिथुन राशीचे तरुण आज मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात, परंतु आधी पालकांची संमती घेतली पाहिजे आणि मगच फिरायला गेलं पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Budh Uday 2024 : मार्चमध्ये होणार बुध ग्रहाचा उदय; 'या' राशी कमावणार बक्कळ पैसा, नोकरी-व्यवसायात मिळणार यश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget