एक्स्प्लोर

Hingoli News : दुचाकी लावण्यावरून हिंगोलीत दोन गटात राडा, तुफान दगडफेक; बाळापुर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप

Hingoli : गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे बाळापुर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. 

हिंगोली : जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे दुचाकी लावण्यावरून दोन गटात राडा झाला आहे. या वादाचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे यावेळी दोन्ही गटाच्या वतीने दगडफेक करण्यात आली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. तसेच, गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे बाळापुर शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. 

दुचाकी लावण्यातून झालेल्या वादातून हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथे दोन गटांत राडा होऊन दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.  29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते, तर दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत बाजारपेठ कडकडीत बंद होती. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

अधिक माहितीनुसार, बाळापूर येथील नांदेड- हिंगोली मुख्य रोडवर अशरफी ट्रेडर्स दुकानासमोर मोटारसायकल लावण्यावरून वाद झाला. थोड्याच वेळात मोठा जमाव जमला आणि एकाला शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. वाद एवढा वाढला की दगडफेक करण्यात आली. यावेळी वादाच्या ठिकाणी माजी उपसरपंच विजय पाटील बोंढारे आले असता दगडफेकीत एक दगड त्यांना लागून दुखापत झाली. त्यामुळे पुन्हा दोन गटांमध्ये तुफान राडा होऊन दगडफेक झाली. दरम्यान या राड्यात आशरफी ट्रेडर्स हार्डवेअरच्या दुकानाचे, दुकानातील सामानाचे व दुकानासमोरील एका मोटारसायकलचे असे एकूण 70 हजारांचे नुकसान झाले आहे. 

अतिरिक्त कुमक मागवावी लागली...

बाळापूर येथील नांदेड-हिंगोली मुख्य रोडवर राडा सुरू असल्याची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील गोपीनवार उपस्थित फौजफाट्यासह तेथे पोहोचले. परंतु, दोन गट मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे त्यांनी तत्काळ अतिरिक्त कुमक मागविली. पण, तोपर्यंत या दोन्ही गटांना शांत करण्याचे काम त्यांना करावे लागले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दोन्ही गट शांत झाले आणि वाद मिटला. मात्र, पोलीस ठाण्यातही रात्री मोठा जमाव जमला होता. विशेष म्हणजे, दोन्ही गटाचे कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास तयार नसल्याने पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. सध्या गावात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अफवा पसरवणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन हिंगोली पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Hingoli : एका हातात पेट्रोल तर दुसऱ्या हातात माईक, ऊसाचे पैसे थकवल्यानं भाजप नेत्यासमोरच शेतकऱ्याचा आक्रमक बाणा 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
हिंगोलीत फटाक्याच्या गोदामाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, 10 ते 12 जखमी, परिसरात खळबळ
Maharashtra Drought: डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव
डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Passed Away: विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
विश्वनाथ ते 'नाना'; मराठी सिनेसृष्टीतलं दिग्गज नाव, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
नाना पाटेकर : दुष्काळमुक्तीचा वसा, शेतकऱ्याचा कैवारी, नानाचं काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Embed widget