एक्स्प्लोर

Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त

या कारवाईदरम्यान आतापर्यंत ट्रॅक्टरची एक ट्रॉली भरून फटाके जप्त करण्यात आले आहेत. जवळपास 2 क्विंटल वजनाचा फटाक्यांचा साठा जप्त केल्याची माहिती

Hingoli: हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीमध्ये राहत्या घरात अवैधरित्या साठवलेल्या फटाक्यांना आग लागून (5 ऑक्टोबर)  मोठी दुर्घटना घडल्यानंतर अखेर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. या दुर्घटनेत तीन घरं जळून खाक झाली, दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर हिंगोली शहरातील अवैध फटाका साठ्यांविरोधात महसूल, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई सुरू केली आहे. (Hingoli Fire)

आज हिंगोली शहरातील विविध ठिकाणी संशयित व्यापाऱ्यांच्या घरांवर आणि अवैध फटाका साठ्यांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईदरम्यान आतापर्यंत ट्रॅक्टरची एक ट्रॉली भरून फटाके जप्त करण्यात आले आहेत. जवळपास 2 क्विंटल वजनाचा फटाक्यांचा साठा जप्त केल्याची माहिती हिंगोली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी दिली.

अग्नितांडवाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

दरम्यान, हिंगोली शहरात झालेल्या अग्नितांडवाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. फटाक्यांच्या गोदामाला आग लागल्यानंतर परिसरात आगीचे प्रचंड लोळ उठताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. आग वाढत असताना जीव वाचवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः धावपळ सुरू होती. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या दुर्घटनेदरम्यान अग्निशमन दलाची गाडी फटाक्यांच्या गोदामासमोर उभी होती. या गाडीमुळे समोरील घरातील तीन जणांचे जीव वाचल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची तीव्रता समोर आलेल्या व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येत आहे.

घरांमध्ये अवैध फटाका साठा; प्रशासनाची तपासणी सुरू

मारवाडी गल्लीतील दुर्घटनेनंतर हिंगोली शहरातील अवैध फटाका साठ्यांची तपासणी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. महसूल, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.ज्या ठिकाणी कोणतीही कागदपत्रं, एनओसी किंवा परवाना नसताना फटाक्यांचा साठा करण्यात आला आहे, अशा साठ्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी दिली. त्यानुसार सकाळपासून हिंगोली शहरात कारवाई सुरू असून ट्रॅक्टर भरून फटाके जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे 2 क्विंटल वजनाचा फटाक्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

'दोन नागरिकांच्या जीवावर बेतलं'

हिंगोली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी प्रांजली मुंडे यांनी प्रशासनाच्या कारवाईबाबत माहिती देताना सांगितलं की, ज्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रं, एनओसी किंवा परवाना नाही आणि रहिवासी भागात अवैधरित्या फटाक्यांचा साठा करून ठेवला आहे, अशा साठ्यांवर जप्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात फटाक्यांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडल्याने प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक सणाच्या आधी आग प्रतिबंधक उपाययोजना आणि एनओसीसंदर्भात संबंधित संस्थांना सूचना देणारी पत्रकं माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली जातात. नागरिकांना फायर ऑडिट करण्याचं आवाहनही केलं जातं. मात्र त्याला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं त्या म्हणाल्या.रहिवासी भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा करण्यात आला आणि त्यात दोन नागरिकांच्या जीवावर बेतलं. त्यामुळे आता प्रशासनाकडून अशा अवैध साठ्यांवर कारवाई केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

जप्त फटाक्यांची विल्हेवाट लावणार

दरम्यान, आतापर्यंत ज्या ठिकाणांहून फटाक्यांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे, त्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहितीही समोर आली आहे. जप्त करण्यात आलेल्या फटाक्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. हिंगोली शहरातील मारवाडी गल्लीमध्ये 5 ऑक्टोबरच्या सायंकाळी घरात ठेवलेल्या फटाक्यांना आग लागून दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. दहा ते बारा जण गंभीर जखमी झाल्यानंतर आता प्रशासनाने रहिवासी भागातील फटाका साठ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई आज दिवसभर सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
Embed widget