Economic advisory council Report : हिंदूंची लोकसंख्या (Hindu Population) 1950 पासून सातत्याने घटत असल्याचे तर दुसऱ्या बाजूला अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढत असल्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्थापन केलेल्या समितीने दिला आहे. 1950 पासून हिंदूंच्या लोकसंख्येत सातत्याने घट होत असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे. पीएम मोदींनी स्थापन केलेल्या आर्थिक सल्लागार समितीने 2024 मध्ये हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरातील काही देशांच्या लोकसंख्येचा अभ्यास करुन, हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
पीएम मोदींनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. या आर्थिक सल्लागार परिषदेने (Economic advisory council Report) भारतातील धार्मिक लोकसंख्येबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मागील काही दशकांमध्ये कोणत्या भारतातील धार्मिक लोकसंख्या कशी वाढली, याबाबतची आकडेवारी या समितीने (Economic advisory council Report) प्रसिद्ध केली आहे.
हिंदूंच्या संख्येत 7.8 टक्क्यांनी घट
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 1950 ते 2015 या काळात भारतात हिंदू बहुसंख्य होते, असं स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे आता हिंदूंची लोकसंख्येत 7.8 टक्क्यांनी घट झाल्याचेही स्पष्ट केले आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये त्या देशातील प्रमुख धर्मियांची लोकसंख्या वाढत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. शिवाय, यूपीएससीत मराठी यशवंतांचा टक्क घसरल्याचेही समोर आले आहे.
जैन, पारशींचीही लोकसंख्या घटली
अहवालानुसार, भारतात बौद्ध धर्मियांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, 1950 ते 2015 या काळात मुस्लिमांची लोकसंख्या 43.15 टक्क्यांनी वाढ झाली, तर ख्रिश्चनांच्या लोकसंख्येत 5.38 टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल आहे. शिवाय शीख धर्मियांच्या संख्येतही 6.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुस्लीम लोकसंख्येचा टक्का वाढला
1950 साली भारतातील हिंदूंच्या लोकसंख्येचा (Hindu Population) वाटा 84 टक्के होता. तो 2015 साली 78 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. तर मुस्लीमांचा 1950 मध्ये असलेला वाटा 9.84 टक्के होता, तो मात्र, 14.09 टक्क्यांवरती पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार समितीने जगभरातील 167 देशांत 1950 ते 2015 या कालावधीत लोकसंख्येत होत असलेल्या बदलांचा अभ्यास केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Baramati Lok Sabha : मतदान झालं, मात्र निकालापूर्वीच खापर फोडाफोडी, सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार, कोण जिंकणार?