Rahul Gandhi : इंडिया आघाडीचं सरकार 4 जून रोजी स्थापन होत आहे. आम्ही हमी देतो की 15 ऑगस्टपर्यंत आम्ही 30 लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा. इंडियाचे ऐका, द्वेष करू नका, नोकरी निवडा असे आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.






मोदी पुढील चार पाच दिवस लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील


राहुल गांधी यांनी व्हिडिओ ट्विट करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. राहुल यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, मोदींच्या हातून निवडणूक निसटली आहे. ते पिछाडीवर असून ते पंतप्रधान होणार नाहीत. पुढील चार पाच दिवस लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील. काही ना काही तरी ड्रामा करतील. मात्र, तरुणांनो आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका. 


बेरोजगारी हाच सर्वात मोठा मुद्दा


ते पुढे म्हणतात, बेरोजगारी हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. मोदींनी दोन कोटी रोजगार देतो म्हणून खोटं बोलले. नोटंबदी केली, चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केली. सर्व कामे अदानींसारख्या लोकांसाठी केली. नोकरी विश्वास योजना आम्ही आणत आहोत. चार जूनला आमचे इंडिया आघाडी सरकार येत असून 15 ऑगस्टपर्यंत 30 लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे काम सुरु होईल. 


इतर महत्वाच्या बातम्या