Indrayani River Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील मावळमधील कुंडमळा येथील जुना पूल कोसळला, 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती, 2 जणांचा मृत्यू
Indrayani River Bridge Collapse : मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पादचारी पूल कोसळला आहे. 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.
इंद्रायणी नदी कुंडमळा पूल दुर्घटना
1/6
मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.
2/6
पुण्यातील मावळमध्ये कुंड मळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे.
3/6
घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. कुंडमळा ओलांडण्यासाठी, या बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी पूल आहे. हाच पूल कोसळला आहे.
4/6
रविवार असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक त्या ठिकाणी उपस्थित होते. काही जण पुलावर उभारले होते. तेव्हा हा पूल कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. अद्याप किती जण बुडाले आहेत. हे स्पष्ट होऊ शकलं नाही, अंदाजे 20 ते 25 जण बुडाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
5/6
घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.
6/6
कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला असून घटनास्थळावरील काही फोटो व्हिडिओ समोर आले असून पुलाचा जो भाग कोसळला आहे. तिथं काही दुचाकी अडकल्याचं पाहायला मिळतं. कुंडमळ्याजवळील या घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती आहे. यापैकी 2 पर्यटकांचा मृत्यू झाला असाव, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 ते 20 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
Published at : 15 Jun 2025 04:34 PM (IST)