एक्स्प्लोर

Valentine Day 2023 Shayari in Marathi: 'एक होकार दे, फार काही नको', 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने खास शायरी; वाचा, प्रेमात पडाल...

Valentine Day Shayari in Marathi: अनेकजण आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शायरीचा सहारा घेतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्हॅलेंटाईन डे स्पेशल शायरी सांगणार आहोत

Valentine Day Shayari in Marathi: दरवर्षी 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) म्हणजेच प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. प्रेमळ जोडप्यांसाठी हा दिवस खूप खास असतो. अनके लोक या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. आपला व्हॅलेंटाईन स्पेशल वाटावा म्हणून प्रेमळ जोडपे अनेक दिवसांपासून तयारीला लागतात आणि त्यांचा व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात. असं म्हणता प्रेमात शायरी ही जादू घडू शकते आणि जी व्यक्ती प्रेमात असते ती नकळतच शायरीही करू लागते. अनेकजण आजही आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शायरीचा सहारा घेतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) स्पेशल शायरी आणि कविता सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला या प्रेमाच्या दिवशी मेसेज करू शकता किंवा ऐकवू शकता.

Valentine Day Message In Marathi : व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) मराठी कविता आणि शायरी 

मस्तक ठेवूनी गेलीस जेव्हा
आगतिक माझ्या पायावरती
या पायांना अदाम्य इच्छा
ओठ व्हायची झाली होती...

- कुसुमाग्रज

पान अळवाचे तशी तू... थेंब पाण्याचा असा मी, 
भेट होते .. स्पर्श होतो .. पण बिलगता येत नाही, 

व्यक्त  ओठांनाच  व्हावे  लागते  प्रत्येकवेळी, 
काळजाच्या भरवश्यावर प्रेम करता येत नाही.

- गोविंद नाईक 

अवघडलेल्या तळहातावर ओठ असे गहिवरले गं,
चिंब पापण्या हाकं अधुरी हनुवट ही थरथरले गं...
किती प्रतिक्षा याच क्षणांची किती किती हा क्षण भोळा,
सोन फुलांच्या चाफ्याभवती क्षणात रुळतो पाचोळा...

- अमोल शिंदे

एक होकार दे फार काही नको
फार काही नको फक्त "नाही" नको
एकदा दोनदा ठीक आहे सखे
पण तुझे लाजणे बारमाही नको
थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी
गुढ शब्दातली माैन ग्वाही नको
 
- वैभव जोशी
 
अनमोल जीवनात, 
साथ तुझी हवी आहे, 
सोबतीला अखेर पर्यंत हाथ तुझा हवा आहे, 
आली गेली कितीही संकटे तरीही, 
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे...

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, 
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, 
श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, 
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय....

अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.

डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !

व्हॅलेंटाईन डे विशेष इतर बातमी: 

Valentine's Day Gift : पार्टनरच्या चेहऱ्यावर गोड हसू आणायचंय? 'या' सुंदर भेटवस्तू द्या, व्हॅलेंटाईन डे होईल अधिक खास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा
Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Embed widget