एक्स्प्लोर

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश, नांदेड जिल्ह्याला तब्बल 566 कोटींचा अतिवृष्टी निधी मंजूर

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नाना यश आले असून नांदेड जिल्ह्याला तब्बल 566 कोटींचा अतिवृष्टी निधी मंजूर झाला आहे.

नांदेड : या वर्षीच्या पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात वारंवार झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित शेतकर्‍यांना सरकारी मदत देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बाधित शेतकर्‍यांना ही अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रयत्न करुन जिल्ह्याला जास्तीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये पहिल्या व दुसरा टप्पा मिळून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी तब्बल 566 कोटींची आर्थिक मदत मंजूर झाली आहे.

या वर्षी नांदेड जिल्ह्यात विक्रमी पाऊस झाला. जिल्ह्यातील विविध भागात वारंवार झालेली अतिवृष्टी व त्यातून अनेक छोट्या-मोठ्या नद्या व नाल्यांना आलेला पूर, यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच अनेक गावांमध्ये घरांती पडझड झाली होती. जनावरांचे गोठे वाहून गेले होते. यात अनेक जनावरे दगावली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. या पार्श्वभूमीवर शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होत होती.

शेतकर्‍यांचे झालेले नुकसान भरपाई करण्यासाठी शासनानी दोन हेक्टरच्या मर्यादित जिरायती पिकांसाठी प्रतिहेक्टरी दहा हजार तर बारमाही पिकांसाठी प्रती हेक्टरी 25 हजार मदतीची घोषणा केली होती. नांदेड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण प्रयत्नशील होते. त्यासाठी महसूल स्तरावर वारंवार सर्व्हे करुन शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देऊन प्रयत्न केले.

या सर्व बाबींचा परिणाम म्हणून 9 नोव्हेंबर 2020 रोजी निघालेल्या शासन आदेशानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 284 कोटी तर 7 जानेवारी 2021 रोजी निघालेल्या नव्या आदेशानुसार दुसर्‍या टप्प्यात 282 कोटी असे एकूण 566 कोटी रक्कम मदत निधी म्हणून प्राप्त झाली आहे. या निधी वाटपाची प्रक्रिया जिल्हाधिकार्‍यांमार्फत सुरु झाली असून लवकरच ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळणारा नांदेड राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 August 2026 : आजचा रविवार 'या' 8 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 'या' 8 राशींसाठी भाग्यशाली! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच मनातील इच्छा होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
Dombivli Road Issue : पाच सहाच महिने झाले निवडून आलो, रस्त्यातील खड्ड्यानं बदनाम झालो, डोंबिवलीत सत्ताधारी नगरसेवकाने कवितेतून उडवली खिल्ली
डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण झाल्यानं नागरिक त्रस्त, नगरसेवकाकडून सभागृहात खड्यावरील कविता सादर
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget