एक्स्प्लोर

Gondia QR Code : QR कोडद्वारे दुकानदाराची फसवणूक, गोंदिया पोलिसांकडून छत्तीसगढमधील दोन आरोपींना अटक

QR Code : गोंदीयात क्यू आर कोड वापरुन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. दुकानदाराला बनावट मेसेज दाखवून त्याची फसवणूक करण्यात आली आहे.

Gondia QR Code : ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या ट्रेंडसोबतच ‘ऑनलाइन फसवणुकी’ च्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत आहे. ‘क्यूआर कोड’ च्या माध्यमातून लोक ऑनलाइन फसवणुकीलाही बळी पडत आहेत.  किराणा दुकानात दोन अनोळखी इसमांनी खाद्य तेलाचे 5 कॅन खरेदी करण्याच्या हेतूने घेतले आणि दुकानात लावलेले क्यू आर कोडचे फोटो काढले. पैसे ट्रान्सफर करण्याच्या हेतूने पुढची प्रक्रिया केली मात्र त्यावर पैसे ट्रान्सफर होत नाही असे सांगुन मोबाईल वर वडीलाकडुन पैसे पाठवत आहोत असे सांगितले. असे सांगून दुकानदाराच्या मोबाईल वर 10,000/- रु जमा झाल्याचे संदेश पाठवले. आणि त्यानंतर दुकानदार अडकला ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात...

जगभरात ऑनलाइन व्यवहारांचा ‘ट्रेंड’ सातत्याने वाढतोय. लोक ऑनलाइन व्यवहारांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलंय. यासाठी लोक अनेक ‘ई-पेमेंट’ पद्धती वापरतात. मात्र ऑनलाइन व्यवहारांचा कल वाढत असल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या (Online fraud) घटनांमध्येही वाढ होते आहे. ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी ठगांनी नवीन मार्ग शोधले आहेत. अशा अनेक युक्त्या आहेत ज्याचा वापर करून निरपराध लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचे बँकिंग तपशील चोरतात. 

किराणा दुकानात अनोळखी इसमांकडून खाद्य तेल खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानदारालाच गंडा

 गोंदिया शहरातही अशीच घटना घडली. गोंदिया येथील एका किराणा दुकानात दोन अनोळखी इसमांनी खाद्य तेल खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानदारालाच गंडा घातलाय. दुकानात लावलेले क्यू आर कोड चे त्यांनी फोटो काढले.  पैसे ट्रान्सफर करण्याच्या हेतूने पुढची प्रक्रिया केली मात्र त्यावर पैसे ट्रान्सफर होत नाही असे सांगुन मोबाईल वर वडीलाकडुन पैसे पाठवत आहोत असे सांगितले. वडीलांकडून पैसे पाठवत आहोत असे सांगुन दुकानदाराच्या मोबाईल वर 10,000/- रु जमा झाल्याचे संदेश पाठवले. त्यावरुन दुकानदाराने अधिक चे 775 रुपये ग्राहकाला म्हणजेच आरोपीला परत केले. खरे पाहता या सगळ्या प्रक्रियेत दुकानदाराच्या खात्यावर पैसे न पाठवता दुकानदाराचीच फसवणूक केली. त्याबाबत दुकानदार फिर्यादीने त्यांचे सहकारी आणि दुकानदार मित्रांचे व्हाटसअॅप ग्रुपवर ही घडलेली बाब सांगितली. घडलेला सगळा प्रकार सांगताच आणखी काही दुकानदारांसोबतही असेच घडल्याचे समोर आले. याच पद्धतीने दोन अनोळखी इसमानी इतर व्यापाऱ्यांचीसुध्दा अशाच प्रकारे फसवणूक केल्याचं ससोर आलं. याची तक्रार गोंदिया पोलिसांकडे करण्यात आली. 

 गोंदिया शहरातील दुकानदाराची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी 24 तासात अटक करुन गजाआड केले. प्रतीक आचारी व रोहित शाहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर आरोपी हे छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहेत. या युवकांनी ऑनलाईन पेमेंटच्या नावावर फसवणूक केल्याची घटना 23 एप्रिलला घडली होती.  CCTV च्या आधारे गोंदिया शहर पोलिसांनी तपास सुरू केला. यात 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

या दोन्ही आरोपीकडून 64 हजार 200 रुपयांचे खाद्यतेलाचे 34 कॅन आणि 5 हजार रुपये रोकड असा एकूण 69 हजार 200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींकडून गोंदिया जिल्ह्यांमधून आणखी अनेक व्यावसायिकांचीदेखील फसवणूक केली असल्याची बाब समोर आली आहे. घटनेचा पुढील तपास गोंदिया पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Gondia News: मुलांच्या पाठीवरील दप्तराचं ओझे कमी होणार, गोंदियाच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये टॅबचं वाटप

 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग! विदर्भासाठी पुढील 15 दिवस महत्वाचे, नेमकी कशी असणार पावसाची स्थिती? हवामान विभागाचा अंदाज काय?
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत, भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचा हाहाकार! अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, यवतमाळच्या पुरात कारसह तीनजण वाहून गेलीत, अनेक गावांचा संपर्क तुटला
Vidarbha Rain: विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला
विदर्भात पावसाचे थैमान! पुरामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला, तर अमरावतीच्या मेळघाटात पावसाचं रौद्ररूप, 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Embed widget