Gadchiroli Rain Updates : विदर्भातील ताज्या पूरपरिस्थितीत गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तेलंगाना राज्यातील येणाऱ्या येलंपली धरणातून अचानक 13.15 लाख इतका मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे सिरोंचा तालुक्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे.
गेले चार दिवस हे तालुक्याचं शहर चारही बाजूनं पाण्यानं वेढलं गेलं आहे. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे वैनगंगा-प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्यानं या गावाला पुराचा वेढा पडला आहे. 1986 साली अशाच पद्धतीनं पूर आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचं आजवर स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यातील केवळ 34 गावं सिरोंचा तालुक्यातील असून सिरोंचा येथील स्थानिक प्रशासन पूरग्रस्त नागरिक आणि पडझड झालेल्या घरातील सावरत असलेल्या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. गोसेखुर्द धरणातील आवक वैनगंगा नदीत अधिक प्रवाहित झाली. जिल्ह्यातील काही मार्ग पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत.
गडचिरोलीत पाऊस ओसरला असला तरी आता त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर समोर आलं आहे. पाहुयात कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?
कोणत्या धरणातून किती विसर्ग?
- मेडीगट्टा लक्ष्मी 6 ते 29 लाख क्युसेक
- गोसीखुर्द 62 ते 4.35 लाख क्युसेक
- येलंपल्ली 0.92 ते 13.15 लाख क्युसेक
मुख्य मार्गाची स्थिती आणि बंद मार्ग
जिल्ह्यात 28 मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहेत. यात महत्वाचे मार्ग गडचिरोली- चामोर्शी, आरमोरी- गडचिरोली, आष्टी- चंद्रपूर, आलापल्ली -भामरागड हे मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहेत.
पुलाचं नुकसान
आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अवजड वाहनं जाण्यास बंदी केली आहे.
सिरोंचा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला मोठं नुकसान
तेलंगणा राज्याला जोडणारा अप्रोज मार्ग पुरामुळे संपर्क तुटला आहे. तर तेलंगणा- महाराष्ट्र- छत्तीसगड या तीन राज्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे या मार्गावरील महत्त्वाची वाहतूक अनेक दिवस बंद पडली होती.
दक्षिण गडचिरोलीचं मुख्य शहर आलापल्लीवरून जाणाऱ्या पाच तालुक्यातील अनेक छोट्या नाल्यांना देखील पूर आला होता. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या इतर पुलांवर देखील तळी झाली आहेत. त्यामुळे या भागातील महत्त्वाची वाहतूक काही काळ बंद अवस्थेत होती. यात आलापल्ली- सिरोंचा, आलापल्ली-आष्टी, आलापल्ली -भामरागड, तर दुसरीकडे आष्टी ते गडचिरोली मार्गावर तडे गेले आहेत.
शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
जिल्हात पाऊस आणि पुरामुळे सर्वाधिक शेतीचं नुकसान सिरोंचा तालुक्याला बसला आहे. शेकडो एकर शेती जमीन पाण्याखाली आली आहे. तालुक्याला लागून असलेल्या मेडीकट्टा धरणाच्या मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे सोबतच तेलंगणा राज्यातील एलमपल्ली धरणातून अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे ही पूर परिस्थिती उद्भवली. ज्यामुळे तालुक्यातील शेतीसह अनेक घर पाण्याखाली आलं आहे. सध्या पूर ओसरला असला तरी सिरोंच्या तालुक्यात नेमका किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे अद्याप कळू शकलं नाही. कारण पुराचं रौद्ररुप नेमकं किती? हे अद्याप कळू शकलेलं नाही.
किती लोकांचं स्थलांतर
- जिल्ह्यातील 45 गावांना स्थलांतर करण्यात आलं.
- जिल्ह्यातील 2785 कुटुंबांना हलवलं
- जिल्हातील एकूण 11836 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवलं
- 45 गावांनापैकी 34 गावे फक्त सिरोंचा तालुक्यातील आहेत.
- सिरोंचा तालु्यातील 2424 कुटुंबाना हलवलं
- लोकसंख्या 10563 सुरक्षीत स्थळी हलवलं
इतर तालुके
- अहेरी 292 कुटुंब आणि 993 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवलं
- मुलचेरा 69 कुटुंबं 270 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवलं
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra Rain : विदर्भात पावसाचं थैमान, आजही मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' भागात ऑरेंज अलर्ट जारी