Maoist Attack: छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील (Dantewada Maoist attack) अरणपूर-पालनार मार्गावर नक्षल्यानी लावलेल्या IDE ब्लास्टमध्ये 11 जवान शहीद झाले. यामध्ये 10 DRG ( डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड) आणि एका चालकाचा समावेश आहे. या घटनेनंतर गडचिरोली जिल्हा हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील (Maharashtra Gadchiroli) सीमावर्ती भागातील पोलीस मदत केंद्रांना पोलीस अधीक्षक यांनी अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अरणपूरमध्ये दुपारी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 10 जवान शहीद झाले. तेथे एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. सर्व जवान डीआरजीचे (जिल्हा राखीव जवान) आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच जवान शोधासाठी निघाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला. यामध्ये 10 जवान शहीद झाले. दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा यांनीही नक्षलवादी हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माओवादी मोठ्या प्रमाणावर असल्याच्या माहितीवरून दंतेवाडा येथून डीआरजी जवानांना रवाना करण्यात आले. यानंतर सर्व जवान तेथून परतत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अरणपूर रस्त्यावरील पालनार येथे स्फोट घडवला. हे सैनिक खासगी वाहनाने निघाले होते. या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला. तो या खाजगी वाहनाचा चालक होता. हल्ल्यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. यात काही नक्षलवादीही जखमी झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाचे अतिरिक्त जवान घटनास्थळी दाखल झालेत.
नक्षली घटनेत शहीद झालेले जवान आणि खासगी चालकांची नावे
1. हेड कॉन्स्टेबल क्रमांक 74 जोगा सोधी
2. हेड कॉन्स्टेबल क्रमांक 965 मुन्ना राम कडती
3. हेड कॉन्स्टेबल क्रमांक 901 संतोष तमो
4. नवीन कॉन्स्टेबल क्रॅमॉक 542 डुलगो मांडवी
5. नवीन कॉन्स्टेबल क्यूमॉक 289 लखमू मरकम
6. निओ कॉन्स्टेबल कमॉक 580 जोगा कावासी
7. नवीन हवालदार क्रमांक 888 हरिराम मांडवी
8. गुप्त सैनिक राजू राम कर्तम
9. गुप्त सैनिक जयराम पोडियम
10. जगदीश कावासी, गुप्त सैनिक
11. धनीराम यादव (खाजगी चालक)