Gadchiroli : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक भागात अवैध दारूची विक्री होत आहे. विदेशी दारूची मोठी तस्करी जिल्ह्यात सतत होत असते आणि गडचिरोली पोलीस या दारू तस्करांना नेहमी सापडा रचून पकडत असतात. काही काळासाठी विदेशी दारू जिल्ह्यात येणे बंद झाल्यानंतर दारूचे शौकीन गावठी दारूकडे वळतात. त्यामुळे ही विषारी दारू पिऊन अनेकांचा संसार उघड्यावर आलेला आहे. यालाच कंटाळून जिल्ह्यात वेळोवेळी दारूबंदीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र दारूबंदी आंदोलन काही यशस्वी ठरले नाही.
आंदोलनानंतर पोलीसांनी दारूविक्रेत्यावर कार्यवाही केलं की, कारवाईनंतर अवैध दारूविक्रीचा धंदा शांत असतो मात्र सगळं काही शांत झाल की परत एकदा अवैधरित्या दारूविक्रीला सुरुवात होते. हीच परंपरा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. पोलीस किती ही नाकाबंदी केली किती ही सापळा रचला तरी पोलिसांना चकमा देऊन दारू तस्कर नवीन नवीन चोर मार्गातून अवैध दारू जिल्ह्यात आणतात. त्यामुळे जिल्ह्यात दारुबंदीला आजपर्यंत पूर्णविराम लागला नाही. त्यामुळे या अवैध दारू विक्रीला कंटाळून परत एकदा दारुबंदीसाठी आगळं वेगळं आंदोलन महिलांनी केलं आहे.
'बाजा बजाओ आंदोलनाने वेधलं लक्ष
धानोरा तालुक्यातील मीचगाव खुर्द या गावात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी आणि गावठी दारूचा धंदा जोरात सुरू होता. अवैध दारू विक्रेत्यांना वारंवार सूचना व नोटीस देऊनही हा व्यवसाय सुरूच होता. परिणामी घरातील कर्ता पुरुष तांदूळ, कोंबड्या विकून दारूचे व्यसन पूर्ण करीत असल्याने अखेर त्रस्त झालेल्या मीचगाव बुज व मीचगाव खुर्द येथील गाव संघटनेच्या महिलांनी दारूविक्रेत्यांच्या घरापुढे 'बाजा बजाओ आंदोलन' करून लक्ष वेधले. सोबतच यापुढे अवैध व्यवसाय करणार नाही, अशा आशयाच्या शपथपत्रावर सहा विक्रेत्यांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात कुठून अवैध दारू तस्करी होते?
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर आहे. आणि जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमादेखील आहेत. यात तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांची सीमा लागून आहे आणि शेजारी चंद्रपूर जिल्हा. दोन राज्यातून जिल्ह्यात अवैध दारू तस्करी होतेच मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटल्यानंतर जिल्ह्यातून सर्वात जास्त अवैध दारू गडचिरोली जिल्ह्यात आणली जाते.
नवीन पोलीस अधीक्षक चा दारू तस्कराना दणका
जिल्ह्यात नवीन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पदभार आपल्या हाती घेतल्यानंतर अवैध दारूवर मोठी कार्यवाई सुरू केली. आल्याआल्या चामोर्शी पोलीस ठाण्याअंतर्गत अवैध दारू येत असल्याची माहिती मिळताच स्वतः आपली टीम पाठवून तस्करांना पकडलं आणि चामोर्शी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाची बदली आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले. त्यामुळे जिल्ह्यात अवैध दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
संबंधित बातम्या