Vidarbha Rain Update : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यात पावसाचा जोर काही भागात कमी झाला असला तरी पार्लकोटा नदीला कालपासून पूर आला आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी भामरागड तालुक्यातील 100हुन अधिक गावांचा कालपासून थेट संपर्क तुटला आहे. तर भामरागड अक्षरक्ष: जलमय झालं आहे. सद्याची स्थिती बघितलं तर भामरागड शहरातील मुख्य बाजारपेठापर्यत पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे 50हुन अधिक दुकाने, घरे पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यातील पाऊसाची एकंदरीत स्थिती बघितलं तर काही भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस पडतो आहे.
मात्र जिल्ह्यातील बंद झालेले रस्त्यांची स्थिती बांघितल तर 4 मुख्य महामार्ग बंद झाले आहेत, तर 26 छोटे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. छत्तीसगढ राज्यात पडत असलेलं जोरदार पाऊस (Heavy Rain) आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्या प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात सगळीकडे आपत्ती व्यवस्थापनाची टीम नजर ठेवून आहे.
वर्धा नदीला पूर, अनेक मार्ग बंद
यवतमाळ जिह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. तर मारेगाव तालुक्याच्या कोसारा गावाजवळ वाहनाऱ्या वर्धा नदीला पूर आला असून पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे कोसरा ते सोईट वाहतूक बंद करण्यात आली. तर वणी तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेलू खुर्द मार्ग आणि शिवणी ते चिंचोली मार्ग बंद झाला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 42. 90 मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे 24 महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. त्यात 16 घरांची ही पडझड झाली.
गोंदियाच्या सडक अर्जुनी येथे अनेक घरांची पडझड
गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला असून याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि देवरी या तीन तालुक्यांना बसला आहे. यात अनेक घरांची पडझड झाल्याचे देखील समोर आले आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरलं होत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी या गावांमध्ये जवळपास 10 ते 15 घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं होतं. त्यापैकी 3 घरांची पडझड झाली असून जीवनावश्यक साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तर घरांची पडझड झाल्याने नागरिकांनी शेजाऱ्यांच्या घरात आसरा घेतलाय. तर शासनाच्यावतीने तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पावसामुळे 1 हजार 210 हेक्टर पिकांचे नुकसान
यवतमाळ जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे जिल्ह्यातील साडेचारशे हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर जून महिन्यापासून आतापर्यंत एक हजार 210 हेक्टर वरील पिकांची नुकसान झाले आहे. अति पाण्यामुळे सोयाबीन आणि कपाशी पिवळी पडण्याच्या मार्गावर आहे. काही शेतकर्यांचे पिके अतिपाण्यामुळे चिपडून गेली आहे. शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला. मात्र, विमा कंपनीने दिलेला नंबरवर कॉल लागत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर काही शेतकर्यांनी नुकसानीची माहिती दिल्यावरही विमा कंपनीचे कर्मचारी पाहणीसाठी आले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.
हे ही वाचा