एक्स्प्लोर

Gadchiroli : रानटी हत्तीमुळे शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, धान्याची नासधुस, गावातल्या घरांचेही नुकसान 

Gadchiroli: गडचिरोली येथील कोरची तालुक्यामध्ये रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे अजूनही येथील नागरिक व शेतकरी चिंतेत आहेत.

Gadchiroli Latest Marathi News Update: गडचिरोली येथील कोरची तालुक्यामध्ये रानटी हत्तीचा धुमाकूळ सुरूच आहे. त्यामुळे अजूनही येथील नागरिक व शेतकरी चिंतेत आहेत. कोरची मुख्यालयापासून अतिसंवेदनशील क्षेत्र असलेल्या कोटगुल क्षेत्रातील तलारगड गावातील एका वृद्ध शेतकऱ्यांचे रानटी हत्तीने पायात दाबून जागीच जीव घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यापूर्वी लेकुरबोडी येथील 80 वर्षीय वृद्ध महिलेला सोंडेत उचलून तिचा जीव घेतला होता. आज घडलेली ही तालुक्यातील दुसरी घटना असून काही दिवसापूर्वीच बेळगाव घाटावर दुचाकीने प्रवास करत असलेल्या कोरचीत एका व्यापारीला हत्तीने जखमी केले होते.
         
सध्या रानटी हत्तीचा वास्तव्य टिपागड पर्यटन देवस्थान असलेल्या जंगल परिसरामध्ये आहे. टीपागड डोंगराखाली घनदाट जंगल परिसरात असलेल्या तलवारगढ गावातील धनसिंग टेकाम (71) यांचे घरात शिरून शुक्रवारी रात्री आठ वाजता दरम्यान 15 ते 20 रानटी हत्तींनी हल्ला केला. यावेळी एका हत्तीने पायात दाबून शेतकऱ्याचा जागीच जीव घेतला आहे. इतकेच नाही तर गावातील सर्व घराचे व शेतीचे नुकसान केले आहे. न्याहायकल येथील चम्मीबाई धनसिंग पुडो, सुखदेव कल्लूराम कुरचाम, चैतु सुखदेव कुरचाम या तीन शेतकऱ्यांचे शेतीची खूप नासधुस करत नुकसान केले आहे. तलवारगढ या गावात आठ घरांची वस्ती आहे. सदर घटनास्थळी मालेवाडा वनपरिक्षेत्राचे वन कर्मचारी आले असून नुकसानीचे पंचनामे करीत असल्याचे सांगितले जात आहे.

सदर रानटी हत्तींना खाद्यासाठी सर्वाधिक केळीचे झाड, मोह फुल पसंत आहे. शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या मोह फुलाच्या सुगंधाने हे रानटी हत्ती गावात येतात. त्यानंतर केळीचे झाड मोहाचे फुल, धान खाण्यासाठी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी रानटी हत्तींनी हल्ला करत शेतीचे नुकसान केले, अशा ठिकाणी केळीचे आणि मोहा फुलांचं साठा असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मागील आठ दिवसापासून सदर हत्ती हे गोटगुल क्षेत्रातील टिपागढ, तलवारगढ, न्याहायकल जंगल परिसरात असल्याची माहिती असून गडचिरोली वन विभागाच्या मुरुमगाव वन परिक्षेत्र वन विभागाचे अधिकारी पिकप गाडी वर डेड बॉडी घेवून कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात पीएम करीता घेऊन आले.  कोरची पोलीस स्टेशन मध्ये याची नोंद दाखल करण्यात आली आहे. तुर्तास सर्व रानटी हत्ती गोंदिया जिल्ह्यात परत गेले आहेत.

आणखी वाचा :
Nashik Crime : नाशिकमधून तीन दिवसांत 13 लाखांच्या दुचाकी सापडल्या, दुचाकी चोरही ताब्यात 

महत्त्वाच्या बातम्या

गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागडमधील गुंडेनूर नाल्याला पूर, सात गावांचा संपर्क तुटला, पुलाचं बांधकाम अपूर्ण झआल्यामुळे नागरिकांना मनस्ताप
गडचिरोलीत मुसळधार पाऊस, भामरागडमधील गुंडेनूर नाल्याला पूर, सात गावांचा संपर्क तुटला, पुलाचं बांधकाम अपूर्ण झआल्यामुळे नागरिकांना मनस्ताप
जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र, बेरोजगार युवकाची लाखो रुपयांची फसवणूक, गडचिरोली प्रशासनात खळबळ
जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र, बेरोजगार युवकाची लाखो रुपयांची फसवणूक, गडचिरोली प्रशासनात खळबळ
Gadchiroli News :  गडचिरोलीत स्मार्ट मीटरचा 'स्मार्ट' धक्का; घरगुती ग्राहकाच्या हाती महिन्याला तब्बल 4 लाख 69 हजार रुपयांचे वीज बिल
गडचिरोलीत स्मार्ट मीटरचा 'स्मार्ट' धक्का; घरगुती ग्राहकाच्या हाती महिन्याला तब्बल 4 लाख 69 हजार रुपयांचे वीज बिल
मासेमारीसाठी गेलेल्या चौघांवर वीज कोसळली, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी, गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील घटना
मासेमारीसाठी गेलेल्या चौघांवर वीज कोसळली, एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी, गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील घटना

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Rain: राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
राज्यात पावसाचा हाहा:कार! मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, मिसिंग लिंकवर दरड कोसळली, खोपोली-पेण महामार्ग पाण्याखाली
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरी, चिपळुणवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Maharashtra Rain LIVE: राज्यात मुसळधार पावसाचं धुमशान, मुंबईला झोडपलं, रायगड, रत्नागिरीवर पुराचं सावट, मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे महामार्ग ठप्प
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Mumbai Pune Expressway missing Link: मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
मोठी बातमी: मिसिंग लिंकवर स्लॅब कोसळला, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प, प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Embed widget