गडचिरोली: उत्तर प्रदेशातील अयोध्येत (Ayodhya) उभारण्यात येत असलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामाचे काम जोरात सुरू आहे. नक्षल्याचा घडामोडीमुळे नेहमी चर्चेत असलेल्या गडचिरोली जिल्हा आता अयोध्यातील ऐतिहासिक वास्तूचा साक्षीदार होणार आहे. राम लल्लाच्या भव्य मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासाठी गडचिरोली जिल्ह्यातील बहुमूल्य सागवान लाकडाचा वापर करण्यात येणार आहे
अयोध्येतील राम मंदिराचे 2024 पर्यंत बांधकाम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. कोट्यवधी राम भक्तांचे अनेक वर्षांचा स्वप्न आता पूर्ण होणार आहे. राम मंदिरासाठी अनेक मौल्यवान वस्तू त्या मंदिरात लावण्यात येणार येत आहे. महत्त्वाचे म्हणजे राम मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार सागवानी लाकडाचा बनविण्यात येणार आहे.
1855 घनफूट सागवान लाकूड पाठवणार
या सागवान लाकडाचे वैशिष्ट्य म्हणजे हे 3 ग्रेड चे सागवान आहे. जे सर्वश्रेष्ठ श्रेणीत येते आणि हे लाकूड फक्त गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील जंगलात आढळून येते. त्यामुळे आलापल्लीच्या सागवन लाकडाची मागणी जगभरात असते. आता अयोध्या येथे बनत असलेल्या भव्य अशा राम मंदिरासाठी देखील या बहुमूल्य सागवानाचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी 1855 घनफूट सागवान लाकूड पाठवण्यात येणार आहे. मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी मंदिराच्या दरवाजासाठी सर्वोत्तम लाकडाची माहिती घेतली आहे.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड हे भारतातील सर्वोत्तम दर्जाचे लाकूड म्हणून मानले जाते. बल्लारशाह आगारात ठेवलेल्या या लाकडाची पाहणी करण्यासाठी लार्सन टुब्रो, टी.सी. ई. आणि ट्रस्टच्या अभियंत्यांनी केली. त्यानंतर मंदिरासाठी लाकडाच्या वापराला हिरवा कंदिल दिला. राम मंदिराच्या उभारणीसाठी आवश्यक गोल लाकूड आणि चिरण प्रक्षाळाचा पुरवठा गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील जंगलातून करण्यात येणार आहे. बहुमूल्य सागवान हे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्लीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जंगलातून सागवान चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा डेपोत पाठवण्यात येतो आणि तिथून त्याची विक्री केली जाते. हे संपूर्ण काम महाराष्ट्राच्या वन विकास महामंडळामार्फत करण्यात येते. मंदिराच्या भव्य लाकडी दरवाजांवर कोरीव काम करण्यात येणार आहे
29 मार्चला भव्य शोभायात्रा निघणार
3 ग्रेड चा सागवान सर्वोत्कृष्ट असतो. हे दर्जेदार सागवान फक्त आलपल्लीच्या जंगलात आढळून येतो त्यामुळे याला जगभरातून मागणी आहे. मंदिरासाठी 1855 घनफूट इतका लाकूड पाठविण्यात येणार आहे. हे लाकूड आलपल्लीवरून बल्लारपूर येथील डेपोत पोहचणार आहे. त्यानंतर 29 मार्च रोजी भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकारचे तीन कॅबिनेट मंत्री व अयोध्या राममंदिरातील पुजारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक ववनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
रामनाम जपाच्या पुस्तिका नवनिर्मित अयोध्या राममंदिरासाठी मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर येथून पाठविण्यात येणाऱ्या काष्ठ (सागवान) पूजनप्रसंगी 29 मार्चला समर्पित केल्या जातील. 29 मार्च रोजी सागवान लाकडाची मिरवणूक बल्लारपूर येथील वनविभाग डेपोतून चंद्रपुरात दाखल होईल. सायंकाळी चांदा क्लब ग्राउंड येथे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.