Gadar 2 Releasing Date : लवकरच गदर 2 सिनेमा (Gadar-2 film) प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. यामध्ये सनी देओलची मुख्य भूमिका असून या सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यामुळे सध्या गदर सिनेमा चर्चेत आहे. अजून गदर 2 सिनेमा प्रदर्शितही झाला नाही, पण जुन्या गदर सिनेमाबद्दल खूप चर्चा केली जात आहे. काही ठिकाणी तर जुन्या गदर सिनेमाचीच स्क्रिनिंग केली जात आहे. तुमचा जन्म नव्वदच्या दशकातील असेल तर गदर सिनेमाची क्रेज समजून येईल. या सिनेमातील प्रभावी संवाद, सनी देओलचा (Sunny Deol) आणि अमिशा पटेलाचा सुरेख अभिनय, इतर कलाकरांचा जबरदस्त अभिनय यामुळे सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ माहिती आहेत. जर तुम्ही गदर सिनेमाचे फॅन असाल, या सिनेमाच्या दुसऱ्या पार्टची आतुरेने वाट पाहत असाल, तर लवकरच गदर 2 सिनेमा  पाहता येणार आहे. नुकतचं या सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण तुम्हाला गदर शब्दाचा अर्थ माहिती आहे का?  गदर शब्द कुणासाठी वापरला जातो? आणि गदर शब्दामागची काय आहे गोष्ट?


गदर शब्दामागचा अर्थ जाणून घ्या 


मूळात गदर हा शब्द उर्दू भाषेतील आहे. या शब्दाचा अर्थ विद्रोह किंवा क्रांती करणे, या अर्थाने वापरला जातो. यासोबत शासन पुरस्कृत हिंसक सैनिक कारवाई किंवा हुकूमशाही वृत्तीचं सरकार आणि कोणत्याही अन्यायाविरोधात पुकारलेल्या बंडाला 'गदर' म्हटलं जातं. याचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही सिनेमाला कनेक्ट करू पाहू शकता की, सिनेमाचं नाव गदर का ठेवण्यात आल होतं. याशिवाय इंग्रजी भाषेत गदर शब्दाला Mutiny म्हटलं जातं. याचा अर्थ बंडखोरी करणे, असा होतो. 


या शब्दाचा रेख्ताच्या डिक्शनरीमध्ये विद्रोहाशिवाय इतर अनेक अर्थ सांगण्यात आले आहेत. रेख्ताच्या डिक्शनरीनुसार, गदर शब्दाचा अर्थ एक प्रकारचा फुगीर पोशाख जो लांबी आणि रूंदीला मोठा असलेला आणि त्यामध्ये कापूस जास्त भरलेला असतो. याशिवाय बैलगाडी चालवताना बसायच्या जागेवर जी गादी टाकली जाते त्यालाही 'गदर'म्हटलं जातं. यासोबत जे फळ अर्धवट पिकलेलं असतं किंवा फळ पिकायला आलेलं असतं त्यालाही 'गदर' म्हणतात. 
 


गदरचा उठावही आहे प्रसिद्ध 
 
जेव्हा भारत ब्रिटीश राजवटीखाली होता त्यावेळी ब्रिटीश सत्तेविरोधात अनेक प्रकारच्या उठाव करण्यात आले होते. त्यापैकी एक गदरचा उठाव आहे. त्याकाळी ब्रिटीशांच्या अन्याय, अत्याचाराला पंजाबची जनता कंटाळली होती. यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी काही पंजाबी लोक उत्तर अमेरिकेत जाऊन स्थायिक झाले. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला. त्यासाठी त्यांनी 13 जुलै 1913 मध्ये गदर पार्टीची स्थापना केली. या पार्टीचे एक मुखपत्र सुरू करण्यात आलं होतं, त्याचं नाव 'हिंदुस्थान गदर' असं होतं. या वृत्तपत्रात ब्रिटीशांविरोधात लढणाऱ्या, झुंजार  क्रांतिकारकांच्या बातम्या छापून येत होत्या. अशा प्रकारे 'गदर' हा शब्द विद्रोह किंवा क्रांतीशी जोडलेला आहे.  


इतर बातम्या वाचा :


Gadar 2 Teaser Out : 'दामाद है वो पाकिस्तान का उसे टीका लगाओ वरना..'; सनी देओलच्या 'गदर 2'चा धमाकेदार टीझर आऊट


Gadar : 22 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा झळकला सनी देओलचा 'गदर'; 'Gadar 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला