Sunny Deol Gadar 2 Teaser Out : सनी देओलच्या (Sunny Deol) आगामी 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या धमाकेदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. तारा सिंह आणि सकीनाची जोडी 21 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'गदर 2' या सिनेमात सनी देओल आणि अमीषा पटेल (Ameesha Patel) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.


'गदर 2'चा धमाकेदार टीझर आऊट (Gadar 2 Teaser Out)


'गदर 2'च्या टीझरच्या सुरुवातीला एका महिलेचा आवाज ऐकू येत आहे. ती म्हणत आहे,"दामाद है ये पाकिस्तान का, उसे नारियल दो, टीका लगाओ वरना इस बार वो दहेज में पूरा लाहौर जाएगा". 'गदर 2'चा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला असून प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 'गदर 2'चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


'गदर 2'चं शूटिंग कुठे झालंय? 


'गदर 2'चं शूटिंग पालमपुर, अहमदनगर, लखनऊ या शहरांमध्ये झालं आहे. पाकिस्तानातील दृश्याचं चित्रीकरण लखनऊतील ला मार्टिनीरी महाविद्यालयात झालं आहे. याच महाविद्यालयात सिनेमातील क्लायमॅक्सदेखील शूट करण्यात आले आहेत. तसेच मध्यप्रदेश आणि इंदौर आणि मांडूमध्येदेखील 'गदर 2'चं शूटिंग झालं आहे. 






'गदर 2'हा सिनेमा तारा सिंह आणि त्याचा मुलगा चरणजीत यांच्या नात्यावर भाष्य करणारा असणार आहे.चरणजीतच्या भूमिकेत उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) दिसणार आहे. उत्कर्ष या सिनेमात सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 1970 मधील भारत-पाकिस्तानच्या युद्धावर बेतलेला हा सिनेमा असणार आहे. तारा सिंह आपली पत्नी सकीनासाठी नव्हे तर लाडक्या लेकासाठी म्हणजेच चरणजीतसाठी सीमा पार करताना दिसणार आहे. 


'गदर 2' कधी होणार रिलीज? (Gadar 2 Release Date)


'गदर 2' हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'गदर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 2001 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'गदर 2' या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. अनिल शर्माने (Anil Sharma) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


संबंधित बातम्या


Gadar : 22 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुन्हा झळकला सनी देओलचा 'गदर'; 'Gadar 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला