Kartik Aryan And Kiara Advani:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अभिनेत्री   कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा 'सत्यप्रेम की कथा'  (Satyaprem Ki Kath) हा  चित्रपट  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या  कार्तिक आणि कियारा हे या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. नुकताच कार्तिकनं कियारासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये कियारा आणि कार्तिक हे खास लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये कियारा आणि कार्तिकच्या गळ्यात फुलांची माळ दिसत आहे. कार्तिकनं शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्ल केल्या आहेत. 


 कार्तिकनं कियारासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आमच्या फेवरेटला तुमचे फेवरेट बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो.'  कार्तिक आणि कियारा यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 


नेटकऱ्यांच्या कमेंट्स


कार्तिकनं शेअर केलेल्या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'सिद्धार्थ भावा, मी असतो तर हे सहन नसतं केलं' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'मला वाटलं कार्तिकचंही लग्न झालंय, मिनी हार्ट अटॅक', 'हिचा सिद्धार्थसोबत घटस्फोट झाला आहे का?' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली.






'सत्यप्रेम की कथा' ची रिलीज डेट


'सत्यप्रेम की कथा' हा चित्रपट 29 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  भूल भुलैया-2 या चित्रपटानंतर नंतर कार्तिक आणि कियारा यांची जोडी  'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात  पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सुप्रिया पाठक, गजराज राव, अनुराधा पटेल, राजपाल यादव हे कलाकार देखील 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत.   मराठमोळी समीर विद्वांस या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.






इतर महत्वाच्या बातम्या:


Satyaprem Ki Katha Trailer : 'सत्यप्रेम की कथा'चा ट्रेलर आऊट; कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज