एक्स्प्लोर

रविना टंडन, भारती सिंह, फराह खान अडचणीत, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

फराह आणि भारतीने एका कॉमेडी कार्यक्रमादरम्यान ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देशभरात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. या कार्यक्रमात त्यांनी वापरलेले शब्द धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मुंबई : अभिनेत्री रविना टंडन, निर्माती, दिग्दर्शक फराह खान, कॉमेडियन भारती सिंह यांनी ख्रिश्चन समाजाविषयी अपमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविना टंडन, फराह खान, भारती सिंह यांनी एका कार्यक्रमामध्ये एका शब्दाचा खालच्या पातळीवर वापर केला. या शब्दाला ख्रिश्चन समाजांमध्ये मोठी प्रतिष्ठा आहे. मात्र त्यांनी त्याचा अश्लील भाषेत त्याचा वापर केला, असा आरोप करत अल्फा ओमेगा या संघटनेने निषेध केला. तसेच या कलाकारांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या संघटनेने केली आहे. एका कार्यक्रमाचे मागच्या आठवड्यात प्रक्षेपण झाले होते. या कलाकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता देशभरातून होत असताना बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये या कलाकारांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणात कलाकारांना अटक नाही झाली तर त्यांना आम्ही घराच्या बाहेर निघू देणार नाहीत, असा इशारा अल्फा ओमेगा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. माहितीनुसार रवीना, फराह आणि भारतीने एका कॉमेडी कार्यक्रमादरम्यान ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देशभरात तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. या कार्यक्रमात त्यांनी वापरलेले शब्द धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एका चॅनेलवर हा भाग ख्रिसमसच्या मुहुर्तावर प्रदर्शित झाला. रविना टंडन सध्या टीव्ही चॅनलवर काही कार्यक्रमांचे परीक्षण करताना दिसून आली होती. हिंदी चित्रपट क्षेत्रात 90 च्या दशकात रविनाचे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्या सौदर्याने अनेकांना घायाळ करणारी रविना आता चांगलीच अडचणीत सापडली आहे. तर भारती सिंह ही प्रसिद्ध कॉमेडियन आहे. सध्या ती कॉमेडी नाईट विथ कपिल शर्माच्या शो मध्ये दिसून येत आहे. तर फराह खान हिने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच ती नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. तिने काही सिनेमांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
पृथ्वीचं तापमान वाढणार, आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार! 19 व्या शतकानंतर सर्वात शक्तिशाली एल निनो
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget