Health Care: फॅटी लिव्हर किंवा यकृतामध्ये फॅट जमा झाल्याची कोणतीही लक्षणं लवकर दिसत नाहीत आणि बहुधा त्यामुळेच अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, फॅटी लिव्हरचा त्रास असेल आणि उपचार घेतले नाही तर यकृताची जळजळ होऊ शकते, ज्याला वैद्यकीयदृष्ट्या 'स्टीटोहेपेटायटिस' (Steatohepatitis) असं म्हणतात. यकृतातील फॅटी डिपॉझिटमुळे शरीराला त्रास होऊ लागतो.
स्टीटोहेपेटायटीसमध्ये काय होतं?
स्टीटोहेपेटायटिस किंवा नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस यकृताला नुकसान पोहोचवते, यामुळे यकृताची जळजळ होते आणि यकृतावर डाग पडतात. म्हातारपण आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची प्रकृती आणखी खालावली जाते, त्यामुळे यकृतामध्ये फॅटी जमा होत असल्यास ते ओळखणे आवश्यक आहे.
फॅटी लिव्हरची लक्षणं
जास्त वजन (Overweight)
जास्त वजन हे यकृतामध्ये फॅट जमा होण्यामागील मुख्य कारण आहे. त्यासाठी बॉडी मास इंडेक्स (BMI) नेहमी तपासला पाहिजे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बीएमआय 25 पेक्षा जास्त असल्यास फॅटी लिव्हर विकसित होण्याचा धोका वाढतो.
मधुमेह (Diabetes)
मधुमेहामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. मेयोक्लिनिकच्या म्हणण्यानुसार, टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांपैकी किमान अर्ध्या लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर झाले आहे. फॅटी लिव्हर टाईप 2 मधुमेहामध्ये देखील भूमिका बजावू शकते. जर तुम्हाला टाईप 2 मधुमेह असेल आणि तुम्हाला फॅटी लिव्हर झाल्यास तुमची प्रकृती आणखी बिघडू शकते.
उच्च ट्रायग्लिसराइड्स पातळी (High triglycerides level)
ट्रायग्लिसराइड्सची उच्च पातळी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोगाशी संबंधित आहे. काही आरोग्य संशोधन अहवालात असेही म्हटले गेले आहे की, उच्च ट्रायग्लिसराइड हे तुम्हाला फॅटी लिव्हर असल्याचा इशारा आधीच देत असते. ट्रायग्लिसराइड पातळी 150 mg/dL पेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.
खाण्याची वाईट सवय (Bad eating habit)
अनियमित वेळांना खाणे, वारंवार बाहेरचे खाद्यपदार्थ मागवून खाणे अशा बऱ्याच गोष्टींमुळे फॅटी लिव्हरचा धोका बळावू शकतो. यकृतामध्ये चरबी जमा होण्याचे आणखी एक कारण म्हणजे बाहेरचे खाणे. उशिरा खाणे, जेवण वगळणे, दोन जेवणांमध्ये योग्य अंतर नसणे हे यकृतावर प्रचंड दबाव आणू शकते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे, नेहमी निरोगी आणि पौष्टिक पदार्थांची निवड करा.
स्लीप एपनिया (Sleep apnea)
ॲप्निया (Apnea) या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे श्वास लागणं किंवा श्वासावरोध. झोपेत जीभ आणि जीभेमागचे काही स्नायू शिथील झाल्यामुळे अशी स्थिती तयार होत असेल तर त्याला स्लीप ॲप्निया असं म्हणतात. झोपेत घोरणं, विचित्र आवाज करणं ही याची सौम्य लक्षणं आहेत. पण, हाच आजार वाढला तर फॅटी लिव्हर देखील होऊ शकते.
फॅटी लिव्हरपासून बचाव कसा कराल?
फॅटी लिव्हरची स्थिती प्रगत अवस्थेपर्यंत (Last Step) पोहोचू नये म्हणून काही घटकांमध्ये सुधारणा करणे महत्त्वाचे आहे. वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आणि खाण्याची पद्धत सुधारली पाहिजे. आहारात निरोगी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. चांगले तेल, संपूर्ण धान्य आणि हंगामी भाज्या वापरून घरी शिजवलेले निरोगी अन्न खावे.
मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल पातळी सारख्या इतर जोखीम घटकांसाठी, वैद्यकीय मदत घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक असल्यास औषधे घ्या.
फॅटी लिव्हर रोगामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यामुळे शरीरात त्याचा फैलाव होणे सोपे होते.
हेही वाचा: