Benefits Of Fennel : बडीशेप ही एक सुगंधी वनस्पती आहे. बडीशेपचा वापर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात केला जातो. मुख्यत: माऊथफ्रेशनर म्हणून याचा वापर केला जातो. याशिवाय बडीशेपमुळे जेवणाची चव वाढवण्यात देखील मदत होते. यामुळे आपल्या शरीराची पचन प्रक्रिया ही सुरळीत राहते. बडीशेपमध्ये काॅपर , पोटॅशिअम , कॅल्शियम , झिंक आणि लोह असते. या घटकांचा फायदा सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी होतो. सोबतच बडीशेप मध्ये भरपूर प्रमाणात अँटी-आँक्सिडेंट प्राॅपरटी असल्या कारणाने त्वचा अजून निरोगी राहते. आपल्या ब्यूटी केअरमध्ये बडीशेपचा वापर केल्यास चेहऱ्यावरील मुरूम , काळे डाग , कोरडेपणा आणि वांग कमी होते. तसेच केसांच्या समस्यांपासून सुटका हवी असल्यास देखील बडीशेपचा वापर करतो. तर याचा नेमका वापर कसा करावा ते जाणून घेऊया.


फेस मास्क


सुंदर, चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी स्किनकेअर रूटीन फाॅलो करण फार महत्वाच आहे. यासाठी त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही बडीशेपचा वापर करू शकता. यासाठी तुम्हाला एक चमचा  बडीशेप, दोन चमचे ओटमील आणि एक थोडे उकळलेले पाणी ही सामग्री लागेल. या सर्व गोष्टी एकत्र करा. त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट 20 मिनीटे चेहऱ्यावर लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. याने तुमचा चेहरा  स्वच्छ आणि तजेलदार होईल. 


टोनर


 बडीशेपचा वापर तुम्ही टोनर म्हणून देखील करू शकता. यासाठी तुम्ही एक चमचा  बडीशेप आणि गरम पाणी घ्यावे. त्यामध्ये थोडेसे  बडीशेप इसेंशिअल ऑइल घालावे. ते एका बाॅटलमध्ये भरून ते टोनर म्हणून वापरावे. 


डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी


खूप वेळ संगणकामुळे बसल्याने डोळ्यांखाली डार्क सर्कल आलेले असल्यास  बडीशेपचा वापर करावा. यासाठी  बडीशेपची पावडर करून ती थंड पाण्यात मिक्स करावी. त्यात पाण्याच्या पट्ट्या बुडवून त्या डोळ्यांवर ठेवाव्यात. ज्याने डोळ्यांना थंडावा मिळू शकतो. 


स्टीम फेशियल


स्टीम फेशियलसाठी एक लीटर पाणी आणि एक चमचा  बडीशेप एकत्र घ्या आणि हे पाणी गॅसवर उकळत ठेवा. आता या पाण्याने चेहऱ्यावर वाफ घ्या. यानंतर स्वच्छ चेहरा पुसून घ्या. याने तुमच्या चेहऱ्याची छिद्र मोकळी होतात. 


केसांची समस्या दूर होते


कोंडा , केसांना खाज सुटणे , केसगळती या समस्यांपासून सुटका हवी असेल तर ,  बडीशेपच्या पुडचे पाणी वापरावे. यामुळे केसगळतीची समस्या दूर होते. 


इतर महत्वाच्या बातम्या


Ashish Vidyarthi Wedding: अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा केलं लग्न; सोशल मीडियावर फोटो व्हायरल