एक्स्प्लोर

पिकावर फवारणी करताना विषबाधा, धुळ्यात शेतकऱ्याचा मृत्यू

फवारणी केल्यानंतर त्रास होऊ लागल्याने दशरथ कोळी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला.

धुळे : विदर्भानंतर आता खान्देशातही कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील शेतकऱ्याचा फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाला आहे. 25 सप्टेंबर रोजी फवारणी केल्यानंतर दशरथ कोळी (28) यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली. विषबाधा होऊन विदर्भातही 20 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा? कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात 20 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. तर साडे पाचशेपेक्षा जास्त शेतकरी विषबाधा झाल्यामुळे उपचार घेत आहेत. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे चिनी बनावटीचे फवारणी पंप असल्याचं समोर आलं आहे. प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत. या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी आहे. पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तुषार फेकतो. या पंपातून निघणारे तुषार हलके राहत असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात. शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे. फवारणी करताना काय काळजी घ्याल? फवारणी करताना तोंडाला कापड लावलं तर श्वास घेता येत नाही. बूट घातले तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेतली नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उलटी, मळमळ, चक्कर येणे हा त्रास सुरू होतो. शेतकरी अनेकदा दिवसभर तापत्या उन्हात काम करतात. कीटकनाशकाचे डब्बे सुरक्षित ठिकाणी जमिनीत टाकून नष्ट करावेत, फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी, कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावे, कोट, हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल या साहित्याचा वापर करावा, फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा न घेता नेमून दिलेल्या मापानुसार कीटकनाशक फवारावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.. ही सर्व आकडेवारी सराकरी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही हजारो शेतकरी उपचार घेत आहेत. त्यामुळे कृषी विभागाने जागरूकता मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. संबंधित बातम्या :

चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा?

फवारणी करताना विषबाधा, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत!

‘फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू, तर 546 शेतकरी व्हेंटिलेटरवर

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 July 2026: आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
आजचा मंगळवार 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग जुळले, कोण भाग्यशाली? कोणासाठी टेन्शन? आजचे राशीभविष्य...
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Maharashtra Rian : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?  
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget