ESIC Chennai 2022 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अर्थात ESIC चेन्नईने अप्पर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ESIC चेन्नईमध्ये या पदांसाठी एकूण 385 रिक्त जागा आहेत. या ESIC भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. जे उमेदवार ESIC चेन्नई भर्ती 2022 साठी अर्ज करणार आहेत. ते येथे वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अनुभव, निवड प्रक्रियेबद्दल माहिती मिळवू शकतात. चेन्नईने 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी भरती जाहीर केली आहे. ESIC ने अप्पर डिव्हिजन क्लर्क, UDC, स्टेनोग्राफर, स्टेनो (Stenographer, Steno) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (Multi-Tasking Staff, MTS) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.  


कसा कराल नोकरीसाठी अर्ज?


अप्पर डिव्हिजन क्लर्क : 150
स्टेनोग्राफर : 16
एमटीएस  : 219


ESIC चेन्नई भर्ती 2022 साठी शैक्षणिक पात्रता आवश्यक 


अप्पर डिव्हिजन क्लर्क : कोणत्याही प्रवाहात पदवीधर आणि संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे, ज्यामध्ये ऑफिस सूट आणि डेटाबेस समाविष्ट आहे.
स्टेनोग्राफर : 12वी पास असणं आवश्यक आहे. तसेच, 80 शब्द प्रति मिनिट इतका शोधण्याचा वेग असावा. तर इंग्रजीमध्ये 50 मिनिटे आणि हिंदीमध्ये 65 मिनिटांसाठी ट्रान्सक्रिप्शन करावं लागेल. ट्रान्सक्रिप्शन फक्त संगणकावरच करावं लागेल.
एमटीएस : उमेदवार 10वी पास असावा


वयोमर्यादा 


UDC आणि स्टेनोग्राफर : 18 ते 27 वर्ष 
एमटीएस : 18 ते 25 वर्ष 


ESIC चेन्नई भर्ती 2022 मधील पदांसाठी वेतन 


यूडीसी : 25,500-81,100 रुपये प्रति महिना
स्टेनोग्राफर : 25,500-81,100 रुपये प्रति महिना 
एमटीएस : 18,000-56,900 रुपये प्रति महिना 


कशी होईल निवड? 


स्किल टेस्ट देण्यासाठी उमेदवारांचा टायपिंगचा वेग हिंदीमध्ये 50 मिनिटं आणि इंग्रजीमध्ये 65 मिनिटं असावा. हा टायपिंगचा वेग संगणकावर असावा. याशिवाय, एमटीएसच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI