SBI Cash Withdrawal New Rule : भारतीय स्टेट बँक (SBI) च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी. बँकेनं ATM मधून पैसे काढण्यासाठीचे नियम पुन्हा बदलले आहेत. SBI ने ATM मधून पैसे काढणे सुरक्षित करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक व्यवहार आणखी सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. 


नवा नियम काय? 


SBI ग्राहकांना आता SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. त्यांच्या एसबीआय एटीएममध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, जो एटीएम मशीनमध्ये टाकल्यानंतरच ग्राहक पैसे काढू शकतील.



काय आहे नवी पद्धत? 


जेव्हा तुम्ही एटीएममधून पैसे काढायला जाल तेव्हा तुमचा मोबाईल तुमच्या सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे. एटीएममधून सामान्य पद्धतीनं पैसे काढण्यासाठी, तुम्हाला पूर्वीप्रमाणेच प्रक्रिया करावी लागेल आणि त्यात पिन टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी विचारला जाईल, जो तुमच्या मोबाइलवर येईल. तो पिन एटीएम मशीनवर टाका आणि त्यानंतर तुम्ही टाकलेली रक्कम तुम्हाला मिळेल. 


नवा नियम अधिक सुरक्षित 


सध्याच्या सर्वच एटीएममधून, तुम्हाला फक्त एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकावं लागतं आणि त्यानंतर तुम्ही कार्डचा पिन टाकून पैसे काढू शकता. परंतु, एसबीआयने यासाठी ओटीपीच्या रूपात सुरक्षेचा आणखी एक स्तर ठेवला आहे. जेणेकरून कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमच्या कार्डमधून पैसे काढू शकणार नाही. कारण ओटीपी तुमच्या मोबाइलवरच येईल.


फक्त SBI च्या ATM वरच काम करणार हे फिचर 


SBI नं ग्राहकांचे आर्थिक व्यवहार सुरक्षित करण्यासाठी सुरु केलेलं हे फिचर फक्त SBI च्या एटीएमवरच काम करणार आहे. जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल आणि तुम्ही SBI ATM मधून पैसे काढत असाल तर ही OTP प्रक्रिया आवश्यक असेल. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना तुम्हाला ओटीपीची गरज भासणार नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा