Infosys Recruitment Drive 2022 : आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसर्‍या तिमाहीसाठी 5,809 कोटी रुपयांचा नफा घोषित केल्यानंतर, भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी Infosys ने म्हटले आहे की, कंपनी सध्या आपल्या जागतिक पदवीधर भरती कार्यक्रमाचा (Infosys Recruitment Drive 2022) विस्तार करण्याचा विचार करत आहे. 55,000 नवीन नोकर भरती करण्याची योजना कंपनीकडून आखली जात आहे. 


विविध वृत्तसंस्थांशी बोलताना, मुख्य वित्तीय अधिकारी निलांजन रॉय म्हणाले की, IT फर्मने विकासाच्या महत्त्वाकांक्षेला पाठिंबा देण्यासाठी 2022 आर्थिक वर्षासाठी प्रतिभा संपादन आणि विकासातील गुंतवणुकीला प्राधान्य देणं सुरू ठेवलं आहे. जागतिक पदवीधर भरती कार्यक्रमाचा विस्तार 55,000 पेक्षा जास्त केला आहे. अहवालानुसार, डिसेंबर 2021 पर्यंत Infosys मध्ये एकूण कर्मचारी संख्या 2,92,067 होती, जी मागील तिमाहीत 2,79,617 आणि डिसेंबर 2020 पर्यंत 2,49,312 होती.


या घोषणेसह, आयटी दिग्गज कंपनीने रोजगाराच्या संधी शोधत असलेल्या फ्रेशर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. 


इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी सलील पारेख म्हणाले की, "कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यावर भर दिला जाईल. या अंतर्गत, आम्ही ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे कर्मचारी कुशल बनवण्यावर भर देत आहोत. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या हिताचाही आमच्या प्राधान्यक्रमात समावेश आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI