SEBI Recruitment 2022 : सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच, SEBI ने सिक्युरिटीज मार्केट ऑपरेशन्स (SMO), कायदा, संशोधन आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील यंग प्रोफेशनल प्रोग्रामसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सेबी लवकरच मेगा भरती करणार आहे. नियामक मंडळ तब्बल 120 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा विचार करत आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2022 आहे. सेबीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार, एकूण 120 जागा रिक्त आहेत. SEBI भर्ती 2022 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार sebi.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.


निवड प्रक्रिया 


लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. 


अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तारखेनुसार :



  • ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीली तारीख : 5 जानेवारी 2022

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जानेवारी 2022

  • प्रवेशपत्र : फेब्रुवारी 2022

  • परीक्षेची तारीख : 20 फेब्रुवारी 2022 (रविवार)

  • निकालाची तारीख : फेब्रुवारी 2022

  • सेबीच्या दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेची तारीख : 03 एप्रिल 2022


रिक्त जागांचा तपशील


सामान्य : 80 जागा 
कायदेशीर : 16 जागा 
आयटी : 14 जागा 
संशोधन : 07 जागा 
अधिकृत भाषा : 03 जागा 


शैक्षणिक योग्यता


सामान्य पदासाठींच्या जागेसाठी : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी, कायद्यातील बॅचलर पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकीमधील बॅचलर पदवी, CA/CFA/CS/CWA
कायदेशी पदासाठींच्या जागेसाठी :  - मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून कायद्याची पदवी
आयटी पदासाठींच्या जागेसाठी : अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ माहिती तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान) किंवा कंम्प्युटर अॅप्लिकेशन्समध्ये मास्टर्स किंवा संगणक/माहिती तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पात्रतेसह (किमान 2 वर्षे कालावधी) कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
संशोधनासाठीच्या जागांसाठी : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सांख्यिकी/अर्थशास्त्र/वाणिज्य/व्यवसाय प्रशासन (वित्त) / अर्थमितीमध्ये पदव्युत्तर पदवी
अधिकृत भाषांच्या जागेसाठी : इंग्रजी विषयांपैकी एक विषय म्हणून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून पदवी स्तरावरील विषयांपैकी एक म्हणून हिंदीसह संस्कृत/इंग्रजी/अर्थशास्त्र/वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदवी


वयोमर्यादा 


वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे, उमेदवारांना अधिक तपशीलांसाठी अधिसूचना पाहण्याचा सल्ला दिला जातो


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI