एक्स्प्लोर

तीन पायाची अभद्र युती महाराष्ट्रासाठी दिशादर्शक नाही : एकनाथ खडसे

भाजप नेते एकनाथ खडसे यांनी अनेकदा आपल्याच पक्षाला धारेवर धरण्याचं काम केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तीन पायाची अभद्र युती असल्याचा आरोप त्यांनी पंढरपुरात केला आहे.

पंढरपूर : वर्षानुवर्षांची आपली विचारधारा, तत्वं बाजूला सारून सत्तेसाठी राज्यात अभद्र युती झाली असून हे तीन पायांची शर्यत महाराष्ट्राला एका दिशेला नेईल असं वाटत नाही, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. सांगोला तालुक्यातील एका कार्यक्रमाला जाताना खडसे विठ्ठल दर्शनासाठी थांबले असताना ते बोलत होते. काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांनी वर्षानुवर्षे जपलेली तत्वं यावेळी सत्तेसाठी सोडून दिली असून पहिल्या 50 दिवसात 50 प्रकाराने समोर आली आहेत. एकमेकांवर आरोप, विसंगत विधाने यातून ही तीन पायाची शर्यत सुरु असून सत्तेसाठी एकत्र आलेली ही अभद्र युती किती दिवस चालेल असं सांगता येत नाही असा टोला खडसे यांनी लगावला. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पुरोगामी पक्ष आहेत. पण आता जनतेसमोर जाताना हे कोणती विचारधारा घेऊन जाणार असा सवालही खडसे यांनी केला. तान्हाजी चित्रपटावरून उठलेल्या वादावर बोलताना खडसे म्हणाले की, शिवाजी महाराजांची तुलना जगात कोणासोबतही होऊ शकत नसली तरी त्यांच्या विचारधारेचे अवलोकन करणे यात गैर काय? असा सवाल केला. त्यांनी मोदी आणि अमित शाह यांचे चेहरे लावलेल्या प्रकरणाचं अप्रत्यक्ष समर्थन केलं. शिवसेना ही 2014 साली काँग्रेससोबत सरकार स्थापन करायच्या तयारीत असल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने उठलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना खडसे म्हणाले की, त्यांच्या आरोपात तथ्य असू शकते असे खडसे यांनी सांगितले. 2014 साली शिवसेना- भाजप वेगळे लढले होते त्यामुळे शिवसेनेने कुणासोबत जायचे हा त्यांचा निर्णय होता. ज्याप्रमाणे यावेळी भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी हे तीनही पक्ष एकत्र आले त्याचपद्धतीने 2014 साली प्रयत्न झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असल्याने त्यांची माहितीत नक्कीच तथ्य असू शकेल असे खडसे यांनी सांगितले. या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपमधील ज्या नेत्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणांच्या विरोधात काम केले त्यांचे पुरावे पक्षश्रेष्ठींना देण्यात आले असून अशा नेत्यांवर लवकरच कारवाई होईल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला. खडसे यांनी यापूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही नेत्यांवर पक्षविरोधी काम केल्याचा आरोप केला होता. आपण पक्षश्रेष्ठींना याबाबत सर्व पुरावे दिले असून आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडली आहे. हा पक्षांतर्गत मामला असल्याने लवकरच ही कारवाई झालेली दिसेल असे खडसे यांनी सांगितले. अजित पवार यांच्यासोबत केलेले सत्तास्थापनेचा प्रयत्न योग्य नव्हता याचा पुनरुचार खडसे यांनी केला. राज ठाकरे भाजपसोबत येण्याच्या प्रश्नावर बोलताना खडसे यांनी सांगितलं की, अजून असे काहीच झाले नसून आता भाजप एकटं समर्थपणे काम करत आहे असं खडसे यांनी सांगितलं. संबंधित बातम्या  जळगाव जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार? नाथाभाऊ किंगमेकरच्या भूमिकेत  जळगाव जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून सारं काही आलबेल  खडसेंकडून चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप, गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण  निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार, एकनाथ खडसेंना जेपी नड्डांचं आश्वासन

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Shivsena Name And Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
Pitru Paksha 2026: पितरांना अन्न अर्पण केल्यानंतर मागे वळून का पाहत नाहीत? धार्मिक मान्यता, लोकपरंपरेमागील रंजक कारण जाणून घ्या...
पितरांना अन्न अर्पण केल्यानंतर मागे वळून का पाहत नाहीत? धार्मिक मान्यता, लोकपरंपरेमागील रंजक कारण जाणून घ्या...

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Nana Patekar Goa Police Registers Unnatural Death Case: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
मोठी बातमी: गोवा पोलिसांकडून नाना पाटेकरांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टकडे लक्ष
Satej Patil: 'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
'शशिकांत पाटील चुयेकरांसाठी तेव्हा मांडव घातला, फटाकड्या, गुलाल आणला होता; त्याच गुलालासाठी पहिले चेअरमन त्यांनाच करणार..' सतेज पाटलांची भावनिक साद
Embed widget