आज खडसे यांनी शरद पवार यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. भाजपमध्ये काही लोकांकडून सातत्याने अपमान होतोय. अपमान असाच सुरु राहिल्यास वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा खडसेंनी काल दिला होता. एकनाथ खडसे भाजपमधील वरिष्ठांच्या भेटीसाठी दिल्लीत गेले होते मात्र, त्यांनी यावेळी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांशी भेटीमध्ये मतदारसंघातील सिंचन योजनांवर चर्चा केली. या योजनांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मदत व्हावी यासाठी पवारांची भेट घेतली असल्याचे खडसे यांनी सांगितले. यावेळी पवारांनी मतदारसंघातील पराभवाबाबत विचारले असल्याचे देखील खडसे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षांनी परवानगी दिल्यास भाजप नेत्यांविरोधात पुरावे देईन, गिरीश महाजनांच्या आव्हानाला एकनाथ खडसेंचं उत्तर
दरम्यान, उद्या खडसे हे मुंबईमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील भेटणार आहेत. अशी माहिती खुद्द खडसे यांनीच दिली आहे. खडसे यांच्या विरोधक नेत्यांशी वाढत्या भेटीमुळे ते काही वेगळा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान खडसे यांच्या वाढत्या हालचाली पाहून भाजपने त्यांची समजूत काढण्यासाठी एक नेता केंद्रातून तर एक नेता राज्यातून त्यांच्याकडे पाठवत समजूत घालण्यासाठी तयारी केली आहे.
आजवर राजकीय करिअरमध्ये अनेक पक्षांनी मला अनेक वेळा त्यांच्या पक्षात येण्याच्या ऑफर दिल्या. मला वेगवेगळी पदं देण्याच्या ऑफर देखील दिल्या गेल्या. मात्र मी पक्ष सोडण्याचा कधीही विचार केला नाही. पक्ष वाढवला आणि विस्तार केला. मात्र आता पक्षातून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. कारण नसताना आरोप केला जात असेल, हेतुपुरस्पर मला टाळलं जात आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले नाहीत तरीही मला क्लीन चिट दिली गेली नाही, असे खडसे यांनी पवार यांना भेटायला जाण्याआधी एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते.
Eknath Khadse | पवारांनंतर खडसे ठाकरेंना भेटणार, खडसेंचा वेगळा निर्णय म्हणजे शिवसेना प्रवेश? ABP Majha
मागच्याच आठवड्यात खडसे यांनी ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे पराभूत झाले आहेत. बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होतोय असे म्हटले होते. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला आहे. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावांसहित आपण वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे देखील खडसे यांनी सांगितलं होतं. या पराभवामुळे राज्यातील ओबीसी नेतृत्वही हरपले आहे, अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली होती. खडसे यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणी चौकशी करुन कुणी दोषी आढळले तर कारवाई करण्याचे आश्वासन खडसेंना दिले होते.
Eknath Khadse | मी काय गुन्हा केला? ते अजूनही शोधतोय : एकनाथ खडसे
हे ही वाचा -
भाजपमधल्या 'या' नेत्यांच्या गाठीभेटी का वाढल्या?