एक्स्प्लोर

Nitin Gadkari : तुमच्यात धमक नाही का? गडकरींचा स्थानिक नेत्यांना सवाल

अदासा येथील गणेश मंदिर व धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या स्थळांसाठी यात्रेकरूंना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. चंद्रभागावरील 4-लेन पुलामुळे ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल व प्रवास सुरक्षित होईल.

नागपूरः मला किंवा पक्षातील नेत्यांना गाव दत्तक घ्या आणि विकास करा, अशी मागणी स्थानिक नेते मला नेहमी करत असतात. आत्ताही एकाने गावाच्या विकासासाठी गाव आमदार बावनकुळे यांना दत्तक द्या अशी मागणी केली. मात्र तुमच्यात धमक नाही का? असा सवाल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्थानिक नेत्यांना केला. तसेच विकास तुम्ही करा, हवी असलेली सर्व मदत आणि सहकार्य करण्याची जबाबदारी आमची आहे. अशी ग्वाही यावेळी गडकरी (Nitin Gadkari) यांनी धापेवाड्यातील स्थानिक नेत्यांना दिली. सावनेर-धापेवाडा-गौंडखेरी राष्ट्रीय महामार्ग 547ईचे ई-लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या धापेवाडा परिसर व एकूणच नागपूर जिल्ह्यात आधुनिक रस्त्यांचे नेटवर्क मजबूत करण्यासाठी आज धापेवाडा, नागपूर येथे 28.88 किमी लांबीच्या व 720 कोटी रुपए किंमत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 547-ई च्या सावनेर - धापेवाडा - गौंडखैरी सेक्शन चौपदरीकरणाचे खासदार कृपाल तुमाने, माजी मंत्री व आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), आमदार टेकचंद सावरकर, डॉ. पोतदार, विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी तसेच अधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.
 
सावनेर - धापेवाडा - गौंडखैरी सेक्शनच्या चौपदरीकरणामुळे परिसरातील अदासा येथील सुप्रसिद्ध गणेश मंदिर व धापेवाडा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या स्थळांसाठी यात्रेकरूंना उत्तम कनेक्टिविटी मिळेल. चंद्रभागा नदीवरील नवीन 4-लेन पुलामुळे धापेवाडा येथील ट्रॅफिक जामपासून मुक्तता मिळेल व प्रवास सुरक्षित होईल. प्रदेशातील कृषी व स्थानीय उत्पादनांची मोठ्या बाजारपेठांपर्यंतची पोहोच सुलभ होईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. 

ग्रीनफिल्डमुळे वाहतूक समस्या सुटेल

6.2 किमीच्या ग्रीनफिल्ड (Green Field) कळमेश्वर बायपासमुळे कळमेश्वर शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित होईल. महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुल, व्हेईक्युलर अंडरपास, उड्डाणपुल व ओव्हरपासच्या प्रावधानांमुळे परिसरातील वाहतूक सुरळित व सुरक्षित होण्यास मदत होईल. गोंडखैरी व चिंचभवन भागातील लॉजिस्टिक व इंडस्ट्रीयल पार्कमध्ये वृद्धी होईल. तसेच भोपाळ, इंदोर येथून मुंबई, हैदराबाद ला ये-जा करणाऱ्या अवजड वाहतुकीपासून नागपूर शहराला मुक्तता मिळेल. नागरिकांचा प्रवास सुरक्षित होईल व वेळेची बचत होईल. आजच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान गोंडखैरी ते सावनेर सेक्शनमध्ये लाईट लावण्यासाठी 9 कोटी रुपये तसेच पुलाच्या सौंदर्यीकरणासाठी 40 लाख रुपयांच्या निधीला मंजूरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली महामार्ग बांधणीतून नागपूर जिल्ह्याच्या प्रगती आणि विकासाचा मार्ग सूकर करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असेही यावेळी गडकरींनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका, जामीन देण्यास दिला नकार 
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका, जामीन देण्यास दिला नकार 
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Gondia : धक्कादायक! चालकाचा कारवरील ताबा सुटला अन् गाडी थेट कालव्यात जाऊन कोसळली, महिलेचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी
चालकाचा कारवरील ताबा सुटला अन् गाडी थेट कालव्यात जाऊन कोसळली, महिलेचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Embed widget